तुझे अंतरंग; विष्णू संकपाळ बजाजनगर

तुझे अंतरंगपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

आत्मबचावासाठी येथे, सरडा बदलतो बाह्यरंग
अन् स्वार्थापोटी माणसा, तू बदलतो तुझे अंतरंग.//

तुझ्या मूर्तीमंत अभिनयात, ही दुनया होती दंग
मुखवट्याची किमयागारी, कित्येकांचा स्वप्नभंग..//

इतरांवर कुरघोडीचा, सदैव मनात बांधतो चंग
लागेना कुणाला थांगपत्ता, किती पछाडले जंग.. //

होतो कधी अजाणतेपणी, अशा असंगाशी संग
सत्य जाणताच पश्चातापे, मग किती व्हावे तंग..//

निगरगट्ट तू निर्ढावलेला, तुझे कमी ना होती ढंग
निष्पापाला तोफेच्या तोंडी, स्वतःचे वाचवी अंग..//

तुझ्यात नाना रंग तरंग, वरवर दाखवशी अभ्यंग
संधी मिळताच डसणारा, तू जणू विषारी भुजंग.. //

विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles