गाभारा;वनिता गभणे, आसगाव भंडारा

गाभारापुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

रोजच्या सारखीच ती निशा
हळूहळू गर्द काळोखात विसावली..
विसायचे होते निंद्रादेवीच्या कुशीत तिलाही..
पण, येईचना नयनात अंगळाई..
त्या संवादातील, “मला आवडतेस तू” हे तीन शब्द…
तीच्या मनात दाटले
‘मी कुणाला का आवडावे? ‘
या प्रश्नानाने विचाराचा किनारा गाठले..
ना रंग, ना रूप, ना कोणता गुण खास..!!
का भावावे मग मी कुणाच्या मनास..?
गर्क विचारातच तीने खिडकी खोलली..
चंद्र, चांदणे हसत होते तीजकडे पाहून..
रातराणीचा दरवळ मनाला गेला मोहून..
त्या तीन शब्दांचा मोरपिसारा
मनावर फिरला..
मन गाभारा तीचा आनंदाने भरला..
नाते त्या दोघींचे निष्पाप, निर्मळ मैत्रीचे..
की, आदरयुक्त प्रेमातील गुरू-शिष्याचे..
जे होते काही..
पण ते तीन शब्द
तीजसाठी भारीच लई…
त्या तीन शब्दाच्या गोड रूंजीतच,
निशा पालटली..
प्रभा उजळली..
ती उठली रोजच्या सारखीच..
कामाला लागली..
आजची प्रभा जरा वेगळी,
चैतन्यमय किरणांनी भारावलेली..
मग, तीला आठवले अचानक काहीतरी..
अरे, राहूनच गेले की सांगायचे..
तीने कागज-पेन हाती घेतला
भरभर लिहून काढली कविता..
कवितेच्या शेवटी लिहले,
“तूही आवडतेस मला..
तू अगदी जादुचा मयुरपिसारा
तुझ्या मैत्रीनेच तर फुलला
माझा ‘मन गाभारा’, ”

वनिता गभणे, आसगाव भंडारा

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles