फसवणूक;पांडुरंग एकनाथ घोलप

फसवणूकपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

दोन मित्र जीवाभावाचे
अनमोल बंधन प्रेमाचे
आयुष्यभराचे सोबती हे
नाते अतूट विश्वासाचे ||१||

एकाशिवाय दुसर्‍याचे
पानही हलेना
एकमेकांना भेटल्याशिवाय
दिवसही ढळेना ||२||

नातेच होते असे काही
पवित्र अन् निर्मळ
एक दुसर्‍यास वाटत होते
निखळ मैत्रीचा परिमळ ||३||

कर्तृत्ववान होते दोघे
आपापल्या क्षेत्रात
ठाऊक नव्हते दोघांनाही
काय वाढले पात्रात ||४||

गैरसमजाची ठिणगी पडली
काळजावर पडला घाव
नियतीनेही कसा मांडला
क्रूर अकल्पित डाव ||५||

घात केला कंटकाने
दोघांमध्ये लावून फूस
एकमेकांना अपराधी ठरवून
दोघांनीही बदलली कूस ||६||

फसवणूकीच्या जंजाळात
अडकले दोघे मित्रवर्य
सिद्ध करू पाहती दोघे
हा जयद्रथ हा सूर्य ||७||

सख्खे मित्र पक्के वैरी झाले
बदलली त्यांची वागणूक
दोघांनाही कळलेच नाही
झालेली त्यांची फसवणूक ||८||

म्हणून म्हणतो जागे व्हा
दाखवा आपली चुणूक
मैत्रीचे रूपांतर शत्रुत्वात होईल
अशी होऊ नये फसवणूक ||९||

मैत्रीचे धागे घट्ट विणूया
फसवणुकीला पडू नये बळी
समाजकंटक अवतीभोवती
विश्वासही करतील राखरांगोळी ||१०||

फसवणुकीचे बालंट नको
गैरसमजाला नकोच थारा
मैत्रीचा प्रवास आपला
विश्वासावर आधारलेला सारा ||११||

पांडुरंग एकनाथ घोलप
ता.कर्जत जि.रायगड
========

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles