दीपशिखा सैनिक शाळेत रविवारी पालक दिन सोहळ्याचे भव्य आयोजन

दीपशिखा सैनिक शाळेत रविवारी पालक दिन सोहळ्याचे भव्य आयोजन



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_मैदानी व लष्करी प्रात्यक्षिके, सांस्कृतिक कार्यक्रम, विज्ञान प्रदर्शनीचे होणार सादरीकरण_

राहुल पाटील, प्रतिनिधी

अमरावती: विदर्भातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण असलेल्या अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथील नवजीवन सोसायटी अमरावती द्वारा संचालित सूर्यकांत जोग दीपशिखा गुरूकुल सैनिक शाळेतील प्रांगणात येत्या रविवार (दि १७) डिसेंबर रोजी सकाळी १०.३० ते ४.३० पर्यंत ‘पालक दिन सोहळा २०२३’ या कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.

चिखलदरा येथील दीपशिखा सैनिक शाळेत आयोजित ‘पालक दिन सोहळा २०२३’ या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. के. एम. कुलकर्णी, संचालक, नवजीवन सोसायटी अमरावती, तर प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त मेजर जनरल ए. एस. देव उपस्थित राहणार आहेत.

‘पालक दिन सोहळा २०२३’ या कार्यक्रमात वर्ग ६ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांची मैदानी व लष्करी प्रात्यक्षिके, सांस्कृतिक कार्यक्रम, विज्ञान प्रदर्शनी व पालक सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘पालक दिन सोहळा २०२३’ या कार्यक्रमासाठी राज्यभरातील पाल्याचे पालक व कुटुंबीय सदस्य उपस्थित राहणार आहेत. विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन चिखलदरा येथील दीपशिखा सैनिक शाळेतर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles