“धुक्यात हरवलेली वाट जीवनाचं मर्म शिकवते”; प्रा.तारका रूखमोडे

“धुक्यात हरवलेली वाट जीवनाचं मर्म शिकवते”; प्रा.तारका रूखमोडेपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

ऋतू भन्नाट
धुक्याचा शाही थाट
शोधूया वाट

सहा ऋतूंचे सहा सोहळे..शरदाचे तर आगमन न्यारे..सजली धरा जणू सौंदर्याने..शुभ्र धुक्यांच्या या दुलईने..चक्षूंना सुखावणारे हे गर्द धुक्याचे नजारे..किती मोहक ना सारे..! खरंच..रस्त्यावर धुक्यांची दाट मखमली चादर पसरते..तेव्हा ही दिव्य शुभ्रिनी हवीहवीशी वाटते,अनुभवावीशी वाटते. मनाला सौंदर्य शितलता देणारी पण जेव्हा आपल्या वाहनाच्या गतीची वाट अडवते त्यावेळी धोक्याची यामिनी भासते.

आयुष्याच्या काही वाटाही अशाच असतात ना..! धूसर होत जाणाऱ्या..पण या दाट धुक्यात हरवलेली ती वाट आपल्याला जीवनाचं मर्म शिकवते. भौतिक सुखासाठी जीवनपथावर आपण सुसाट वेगाने धावत असतो ंआपल्या गतीला नियंत्रण नसतं.म्हणूनच की काय या वेगाला संयमित करता येण्यासाठी. आपल्या वाहनाचा वेग धुक्यातून मंदावतो..मानवी गतीला नियंत्रित करणारे गतिरोधकाचे निदर्शक म्हणजे जणू हे धुके..मानवी मनाच्या उधळलेल्या ‘स्वैर वारूला’ वठणीवर आणण्याचा प्रयत्न करतात जणू हे धुके..समोरील धोक्याचं आवरण बाजूला सारण्याकरता.चूकीच्या गोष्टींपासून परावृत्त करतात.

म्हणूनच जीवनक्रमाचा पथ दाट धुक्यात हरवला असताना संयमरूपी आत्मविश्वासाचा सूर्य त्याच्या प्रखर तेजोमय किरणांनी या वाहनाच्या इंडिकेटर व फॉगलाईट प्रमाणे जीवनाचा मार्ग नक्कीच दाखवतो.फक्त संयतपणे निसर्गाच्या प्रत्येक टप्प्यावर शांत व चालत राहावे त्या वाटेवर बोध घेत घेत… निसर्ग जगण्याची नवी दिशा व आशावाद मिळवून देतो. सुखदुःखाच्या अंधारातूनही मग उषा उगवेल.

धुक्यात हरवलेली जीवनरुपी वाट डोळसपणे साहित्यिकांच्या लेखणीला गवसावी म्हणून कदाचित आ. राहुल सरांनी हे चित्र दिलेलं. त्यावर खरे उतरण्याचा प्रयत्न सर्वांनी केलाय. सर्वांचे अभिनंदन. असेच लिहिते व्हा…!

प्रा तारका रूखमोडे गोंदिया
मुख्य परीक्षक,सहप्रशासक,संकलक
मराठीचे शिलेदार समूह

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles