दीपशिखा सैनिक शाळेत ‘पालक दिन सोहळा २०२३’ उत्साहात संपन्न

दीपशिखा सैनिक शाळेत ‘पालक दिन सोहळा २०२३’ उत्साहात संपन्नपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

मैदानी व लष्करी प्रात्यक्षिके, सांस्कृतिक कार्यक्रम, विज्ञान प्रदर्शनाचे सादरीकरण

पालकांनी वाचला विविध तक्रारी व समस्यांचा पाढा

अमरावती: विदर्भातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण असलेल्या अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथील नवजीवन सोसायटी अमरावती द्वारा संचालित सूर्यकांत जोग दीपशिखा गुरूकुल सैनिक शाळेतील प्रांगणात रविवार (दि १७) डिसेंबर रोजी सकाळी १०.३० ते ४.३० पर्यंत ‘पालक दिन सोहळा २०२३’ या कार्यक्रमाचे भव्य आयोजन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

चिखलदरा येथील दीपशिखा सैनिक शाळेत आयोजित ‘पालक दिन सोहळा २०२३’ या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. के. एम. कुलकर्णी, संचालक, नवजीवन सोसायटी अमरावती, तर प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त मेजर जनरल ए. एस. देव व ब्रिगेडीयर संग्राम दळवी प्रामुख्याने उपस्थित होते. सैनिकी विद्यार्थी हे बंधुभाव स्नेहासोबत राहतो ते एक मिशन प्रमाणे असते, त्यात जात, धर्म, नाव याचा फरक पडत नाही तर ते आपला टास्क पूर्ण करतात. सैनिकी शिक्षण हे एक प्रकारे आत्मविश्वासाने जीवन जगण्याचा विश्वास देतो. सैनिकीबाणा आचरणात आणला तर आपला देश प्रगती करेन. देशाचे सत्कार्य म्हणजे सैनिकी जीवन असल्याचे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त मेजर जनरल ए. एस. देव यांनी याप्रसंगी केले.

आजचा हा पालक दिनाचा कार्यक्रम यूनीक झाला असे मी समजतो असे उद्गार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले डॉ. के. एम. कुलकर्णी, संचालक, नवजीवन सोसायटी अमरावती यांनी आपल्या भाषणाप्रसंगी काढले. यासाठी ज्यांनी परिश्रम घेतले देशपांडे सर, गौतम सर, सावरकर आणि सर्व वर्षभरातील कार्यक्रम युट्युबवर प्रसारित करणारे
अलोकने सर आणि ज्यांनी उत्कृष्ट बैंड पथक तयार केले आणि परीश्रम घेणा-या कांबळे सरासंह अध्यापन करणा-या सर्व शिक्षक वृंदाचे आभार मानले. मुलामध्ये झालेला बदल आज आपण सर्व पालकांनी बघितला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी उपस्थित पालकांचेही आभार मानले.

‘पालक दिन सोहळा २०२३’ या कार्यक्रमात वर्ग ६ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांची मैदानी व लष्करी प्रात्यक्षिके, सांस्कृतिक कार्यक्रम, विज्ञान व गणित प्रदर्शनात आपल्या प्रयोगाचे सादरीकरण केले. सोबतच चित्रकला व रांगोळी स्पर्धैचेही आयोजन करण्यात आले होते. मागील वर्षी दहावी व बारावीत सर्वात जास्त टक्के प्राप्त करून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थांचा पाहुण्यांच्या हस्ते रोख रक्कम, मेडल व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

दुपारी भोजनानंतर पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. ‘पालक दिन सोहळा २०२३’ या कार्यक्रमासाठी राज्यभरातील पाल्याचे पालक व कुटुंबीय सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन चिखलदरा येथील दीपशिखा सैनिक शाळेतर्फे करण्यात आले होते. याप्रसंगी उपस्थित पालकांनी विविध तक्रारी व समस्यांचा पाढा सर्वासमक्ष वाचून दाखवला.या सर्व तक्रारी व समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन याप्रसंगी ब्रिगेडीयर संग्राम दळवी यांनी दिले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles