ऋणानुबंध साहित्यिकांचे

ऋणानुबंध साहित्यिकांचे



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

शब्द भावना वाचतांना
जुळले मन एकमेकांचे
जणू पूर्वजन्मीचेच भासले
ऋणानुबंध साहित्यिकांचे

भिन्न भिन्न स्वभाव जरी
मात्र भावना सम अंतरी
न भेटताही परस्परांना
जागा दिली हृदयघरी

गाव शिवार जरी वेगळे
जुळून आली आपुली नाळ
निराश होता दुजा कुणी
पोटात येती दाटूनी कळ

आहोत जरी अनभिज्ञ आपण
परि चुकून पडल्या ज्या गाठी
आत्यंतिक या जिव्हाळ्यामुळे
बघा वाटू लागल्या रेशीमगाठी

साहित्याचे होता कौतुक
इंचभर फुलती छाती
नकळतच साहित्यिकांचे
ऋणानुबंध जुळून येती

प्रा. दिनकर झाडे, गडचांदूर
जि. चंद्रपूर
======

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles