शिष्टाचार शब्दांचे

शिष्टाचार शब्दांचे



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

शब्द मन जिंकतात. शब्द मन दुखावतात. शब्द आनंद देतात. शब्द घायाळ करतात. शब्द माया लावतात. शब्द रागावायला लावतात. किती आणि काय सांगू या शब्दांची जादू. आज शिष्टाचार या वर शब्द जादू कशी हे पाहू. प्लीज, सॉरी, थँक्स, वेलकम, एक्सकूज मी, सुप्रभात, शुभदुपार, शुभ सांज, शुभ रजनी अशा अनेक शिष्टाचारयुक्त शब्दांची बाग आपल्या जवळ आहे. यातील ‘सॉरी’ हा शब्द मनास झालेल्या वेदना क्षणात घालवतो. त्या जागी क्षणभर आनंद देतो. रागाचा पारा कमी करतो. परवा आमची सहल बालवाडी ते चौथी पु. ल. उद्यान, ग्रामसंस्कृती पाषाण, येथे गेली होती. आमच्या दोन गाड्या होत्या. एकामागोमाग होत्या.

आमची गाडी एका स्कूटरवाल्याने अडवली. आमच्या ऑर्गनायजरने विचारले” काय झाले? ” तो माणूस खूप चिडला होता. तो बोलला “बाईंना बोलवा. मला त्यांच्याशी बोलायचंय.” मी आणि मनिषा( मैत्रीण ) दोघी पुढे गेलो. त्यांना विचारले काय झाले?. पण तो खूप चिडला होता. रागाने लाल झाला होता. आम्हांला म्हणाला, ” AVM शाळा न तुमची? काय शिस्त तुमची? मुलांना काय शिकवता? ” आम्ही बोललो “काय झाले?” त्याने सांगितले ” तुमच्या गाडीतील मुलांनी खाऊचे कागद खाली टाकलेत, पोलिसांनी पाहिले. तुमच्या शाळेची कंप्लेंटच करतो “असे बरेच काही उरकले.. शब्द रागाचे, तावातावाचे होते. मनिषा पटकन मागे गेली खरच खिडक्या उघड्या आहेत काय. पाहिल्या.एक खिडकी थोडी उघडी होती. ती तिथेच थांबली.

मी त्या गृहस्थाला बोलले,” व्हेरी सॉरी. आता यापुढे मुले असे करणार नाहीत याची काळजी घेतो. पण जर झाले असेल, तर खरेच सॉरी. ” तो लगेच शांत झाला. व आमच्या गाडीला जाण्याचा इशारा केला. मी थँक्स बोलून हात जोडले. मॅटर संपवला. इतके सोपे आहे. पण मी जर चिडून त्याला प्रतीउत्तर म्हणून काही शब्द सुनावले असते तर, अजून वाद वाढले असते. उदा.. तुम्ही आमची शिस्त का काढता? शिक्षक पेशाला का नावे ठेवता? या प्रकारे…. पण सॉरी शब्दाने जादू करून पुढील प्रवास सुखकर केला. नमन या शब्दांच्या बागेला. या शब्दांच्या जादूत माणसाने हरवावे. मुलांना शिष्टाचार शिकवावेत. स्वतः पाळावेत. आनंद द्यावा अन् घ्यावा. जीवन नक्कीच सुखकर होईल. पुढील लेखात आपण,’प्लीज’ हा शब्द पाहू… तोपर्यंत विराम..!

वसुधा वैभव नाईक
धनकवडी, जिल्हा- पुणे
========

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles