सलीम कुत्ता २०१६ पासून येरवडा तुरूगांत’; ‘तो’ व्हिडीओ त्या पूर्वीचा

‘सलीम कुत्ता २०१६ पासून येरवडा तुरूगांत’; ‘तो’ व्हिडीओ त्या पूर्वीचा

पुणे: नाशिकमधील पार्टीमुळे चर्चेत आलेला दाऊद इब्राहिम टोळीतील गुंड महंमद सलीम मीर शेख उर्फ सलीम कुत्ता गेल्या सहा वर्षांपासून येरवडा कारागृहात असून, या कालावधीमध्ये एकदाही त्याची जामिनावर किंवा पॅरोलवर मुक्तता झाली नसल्याची माहिती कारागृह प्रशासनाने सोमवारी दिली. त्यामुळे विधानसभेच्या अधिवेशनामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नाशिकचे शहराध्यक्ष सुधाकर बडगुजर यांच्या कथित सहभागाचा सादर करण्यात आलेला व्हिडीओ २०१६ पूर्वीची असल्याचे स्पष्ट झाले आहे.पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

काय आहे प्रकरण?

भाजपा आमदार नितेश राणे यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांच्यावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक आणि मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी असलेल्या सलीम कुत्ता सोबत पार्टी केल्याचा आरोप केला होता. यासंदर्भातला एक व्हिडीओ आणि फोटो त्यांनी समोर आणले होते. यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर नाशिक पोलिसांकडून सुधाकर बडगुजर यांची चौकशी सुरू आहे. याप्रकरणात आतापर्यंत अनेक घडामोडी घडल्या आहेत.

व्हिडीओ समोर आल्यावर बडगुजरांची पहिली प्रतिक्रिया काय होती –

बडगुजर म्हणाले, माझ्यावर आरोप करण्याआधी त्यांनी माहिती घ्यायला हवी होती. २०१६ साली विजया रहाटकर यांनी नाशकात सभा घेऊन वेगळ्या विदर्भाची मागणी केली होती. त्या सभेविरोधात आम्ही आंदोलन केलं. त्यावेळी माझ्यासह अनेक शिवसैनिकांवर गुन्हे दाखल झाले होते. मला याप्रकरणी १४ दिवस तुरुंगात जावं लागलं. मी नाशिक मध्यवर्ती कारागृहात होतो. तिथे बॉम्बस्फोटातील आरोपीदेखील होते. परंतु, आम्हाला त्याची काही कल्पना नव्हती.

सलीम कुर्लाशी माझं नाव जोडलं गेलं. परंतु, त्याला १९९२-९३ ला अटक झालेली आणि मी २०१६ ला नाशिक तुरुंगात गेलो. जो व्हिडीओ दाखवला जातोय त्यात चुकीच्या पद्धतीने मॉर्फिंग केलं आहे. गुन्हेगार तुरुंगात असेल तर मग तो बाहेर कसा काय आला? किंवा तो पॅरोलवर असताना सार्वजनिक कार्यक्रमात आमची भेट झालेली असू शकते. परंतु, मला काही माहिती नाही. माझा कधी त्याच्याशी संबंध आला नाही. मध्यवर्ती कारागृहात असताना मी तिथे वावरलो आहे. तसेच सार्वजनिक जीवनात आमची कुठे भेट झाली असेल तर मला काही माहिती नाही. किंवा ते मॉर्फिंग असू शकतं. याप्रकरणी मी पोलिसांना सहकार्य करेन.

कोण आहेत सुधाकर बडगुजर ?

सुधाकर बडगुजर हे नाशिक शिवसेना उबाठा गटाचे महानगर प्रमुख आहेत. सन 2007 पासून सुधाकर बडगुजर यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. 2007 मध्ये ते नाशिक महापालिकेत अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यावेळी शिवसेनेचे नगरसेवक तथा माजी महानगरप्रमुख विनायक पांडे हे अपक्ष नगरसेवकांच्या पाठिंब्यावर महापौरपदी विराजमान झाले होते. तेव्हाच्या अपक्षांच्या गटात सुधाकर बडगुजर यांचा समावेश होता. यातूनच बडगुजर शिवसेनेच्या संपर्कात आले. 14 जून 2008 रोजी एका जलकुंभाच्या भूमिपूजन कार्यक्रमात बडगुजर यांचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नेते संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश झाला. अभ्यासू आणि आक्रमक शैलीमुळे बडगुजर यांच्याकडे पक्षाने 2009 ते 2012 अशी तीन वर्षे नाशिक महापालिकेचे सभागृहनेतेपद सोपविले. पुढे नाशिक महापालिकेची सत्ता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे गेल्यानंतर 2012 ते 2015 अशी तीन वर्षे बडगुजर यांनी विरोधी पक्षनेतेपद भूषविले. 2014 मध्ये त्यांना पक्षाने नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली यात त्यांचा पराभव झाला. गेल्या 15 वर्षा पासून ते नाशिक महानगरपालिकेच्या नगरसेवक पदावर ते कार्यरत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी नाशिक पश्चिम मतदारसंघातुन महाविकास आघडीचे संभाव्य उमेदवार म्हणून त्याच्याकडे बघितलं जात आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles