दवबिंदू आणि गारा

दवबिंदू आणि गारा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

आठवणीतील रम्य सकाळ
पुन्हा नव्याने उघडून पाहिली
दवबिंदू आणि गारा सोबत
प्रीतीची बेधुंद गाणी गायली

कोवळ्या किरणांचा तो स्पर्श
हळूच कानी गुणगुणुन गेला
सुख दुःखाचा अबोल ठाव
अंतरंगात या बोलुनिया आला

हिरव्या पानावर जरी सुंदर रूप
तरी नसे रूपास अनादी काया
टपोऱ्या थेंबाचा घट्ट तो गारा
क्षणात विरून संपविती माया

एकाच रक्ताच्या दोन नात्यात
जरी दाखवीते हा विरोधाभास
सुंदर रूप अन बळजबरी मारा
कधीच ना ठरला एकच आभास

मनातील जीर्ण ती विचारमाला
अलगद गारा सम विरून गेली
स्वीकारून मनी नवविचार ते
दवबिंदू सारखी सोनेरी झाली

पारदर्शक प्रेमाचे जणू प्रतिबिंब
दवबिंदू चा स्वच्छ असे चेहरा
गारा सम राग,द्वेष,भावनेने तो
बदलते सुंदर मनाचा या मोहरा

माधुरी काळे कावडे
वणी,जिल्हा यवतमाळ

Previous article
Next article

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles