समजून घे ना

समजून घे नापुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

चैतात येईल नवी पालवी
पानगळीला का घाबरशी
मधुमास असेल आपलाच
समजून घे ना सखे जराशी….

अमावस्येची रातही सरेल
काळोख पाहून का दडशी
शरदाचे चांदणे तर आपले
समजून घे ना सखे जराशी….

उधाणल्या लाटा ओसरतील
किनारा सोडून तू का पळशी
ओहोटीचा असेल शांत सागर
समजून घे ना सखे जराशी….

घनघोर रण मेघांचे अंबरी
वसुंधेरेवर असून बावरशी
पावसानंतर निरभ्र आकाश
समजून घे ना सखे जराशी…‌.

सुख दु:ख तर येतील जातील
आजच्या स्थितीवर का रडशी
झुंज देण्याचे बळ मनगटात
समजून घे ना सखे जराशी….

अरविंद उरकुडे, गडचिरोली

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles