थकलोय मी

थकलोय मी



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

खरेच का थकलोय मी?
अं… हं.., हे मुळीच नाही बोलायचं
माहीत आहे मलाही,
देह चाललाय हळूहळू वार्धक्याच्या दारात…
आयुष्याच्या पानझडीला झाली आहे सुरवात..
अहो, आला तो जाणारच..
हा निसर्गाचा नियमच..
म्हणून का चिंतेत त्या,
सारखे कुढत बसायचं..
थकलोय मी? अं.. हं..
हे मुळीच नाही बोलायचं..
या पानझडी आधी कधीकाळी
होताच ना बहरात तुम्ही..
कधी तुम्ही कुणाच्या प्रेमात..
कधी कुणी तुमच्या प्रेमात…
कधी कुणाचे पिऊन दु:खाश्रू
फुलवले असतीलच आनंदाचे गुलाब..
कधी वठविली असेलच देवदुताची भुमिका…
माणुसकीचा एखादा रोप पेरून,
सजवीली असेलच कधीतरी मानवतेची वाटिका…
बस्स, झाले तर मग..
पुरेशी आहे ही आठवणींची शिदोरी…
आता,याच आठवणींच्या झुल्यावर बेभान होऊन झुलायचं…
थकलोय मी? अं.. हं..
हे मुळीच नाही बोलायचं..
आता अपेक्षेच्या ओझ्याला,
चार हात दूर सारायचं…
त्या षडःरिपूंशी जरा फटकूनच वागायचं..
कर्तव्याच्या निवृत्तीचे क्षण,
स्वत:च स्वतः साजरा करायचं…
आणि आलाच जर तो घ्यायला
तर त्याच्या मागे हसत हसत
गुपगुमान चालायचं…
थकलोय मी? अं.. हं..
आता हे मुळीच नाही बोलायचं..

वनिता गभणे आसगाव, भंडारा

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles