कविता माझी

कविता माझी



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

कवितेत फुलते माझ्या
भावभावनांची अभिव्यक्ती
हृदयातून अलगद कागदावर
अवतरते दिव्य शक्ती..
कविता एक झरोका
मायेचा कवडसा मज देते
दुःखात ही आधार देऊन
जगण्याचं बळ देते.
कविता ही माझी …
अंतरंगातून स्फुरते..
मनमोकळा श्र्वास घेऊन
काव्य नभांगणी विहरते…
शब्दांचा साज लेऊन
खुले कवाडे अंतर्मनाची
चैतन्य आशा जागवून
भान ठेवते जाणिवांची…
उत्स्फुर्त आविष्कार..
नवरस भावनांचा..
सुखकर जीवनप्रवास
लिलया पेलते संकटांचा..
कधी श्रावणातील
सुखद प्रीत फुलविते..
कधी अंतरीचा..
दाह शमविते..
गुज अंतरीचे खोलून
माझं भावविश्व फुलविते..
नित्यनवीन विषयातून
ज्ञानपिसारा फुलविते..
आत्मिक समाधान देऊन
काव्यरूपात गिरक्या घेते..
कविता माझी घेऊनी वसा
जीवनप्रवास सुखकर करते…

सुजाता सोनवणे
सिलवासा दादरा नगर हवेली.

Previous article
Next article

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles