माझी आई

माझी आई



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

आजारी आईच्या भेटीला
आसुसलेली लेक ती..
अंतर होतं फारच लांब
मनी होती अनामिक भिती..
इकडे डोळ्यात प्राण आणून
वाट बघत होती आई
तिला लेकीच्या भेटीची घाई…
दिवाळीचा सण होता जवळ
सगळी कडे उत्साही वर्दळ..
पण ह्या घरी मात्र…
आजाराने ठोकला होता तळ..
लेक आली धावत घरात
आईची अवस्था बघून
हुंदका दाटून आला उरात.
लेकी,जावई, नातवांना बघता
आईचा मात्र सुखावला जीव..
एरवी आईची बडबड किती
लेक येणार म्हणून गडबड अती..
आज फक्त स्तब्ध अन् मौन ती
वाचा आजाराने गेली होती..
अचानक हातपाय थंड झाले..
नाड्यांचे चलन हळुहळु थांबले
ऐन वसुबारसेचा दिवस
काळाच्या पडद्याआड
आई गेली होती
अखंड सौभाग्याचं लेणं घेऊन.
चेहऱ्यावर समाधान अन् शांती.
लेकरे झाली पोरकी
बाप तर भ्रमिष्टा सम वागती…
पण तिच्या मृतदेहा जवळ अक्षरशः
आक्रोश करतं होती अख्खी खोली..
लेकीला वाटले गेली
आपलीच आई..
इतक्या डोळ्यांचे रूदन बघून
लेकीला त्या क्षणी कळली
आईची पुण्याई..
आधारवड कोणा कोणासाठी
होती ती मायेची सावली.
अशीच पुण्यवान होती माझी माऊली..
आता फक्त तिची शिकवण
आठवते पावलोपावली…

मृदुला कांबळे गोरेगांव -रायगड

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles