शेवटी…’काळ हेच औषध असतं’; सविता पाटील ठाकरे

शेवटी…’काळ हेच औषध असतं’; सविता पाटील ठाकरेपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

दुःखाला कसा आवर घालू सुनबाई.! मी पोट गमावलं आणि तू तुझं कुंकू,कालपासून बघते मी…अश्रूही सुकलेत तुझे आणि माझेही. वेदनेला फुंकर घालत जरा भूतकाळात गेले,आठवते मला आजही ती सकाळ. आनंदाच्या झुल्यावर झुलत मी यांना ती बातमी सांगितली की तुम्ही बाबा होणार आहात.किती किती आनंदी झालेले हे,अक्षरशः मला उचलून घेतलेले आणि आनंदाने नाचले देखील. त्या आनंदातच निघाले आणि पंधराच मिनिटातच काळाने असा घाला घातला की माझं विश्वच चिरडलं गेलं त्या ट्रक खाली. ते तर गेलेत कायमचे कधीही परत न येण्यासाठी. त्यांचा अवघ्या एक महिन्याचा अंश होता माझ्या उदरात.मी ना कुणाचे ऐकले,ना समाजाची पर्वा केली. त्यागाच्या यज्ञात स्वतःच्या तारुण्याची आहुती दिली.मी जन्म दिला माझ्या बाळाला, मोठं केलं, वाढवलं, जोपासलं दुःखावर केवळ “काळ हेच औषध “असतं याची वारंवार प्रचिती घेतली.

माझा रवी मोठा झाला, शिकला,क मावता झाला मला वाटलं की देवाच्या परीक्षेत मी पास झाले. मी नव्याने जगायला सुरुवात केली,तुझ्या रूपाने लक्ष्मी ही आणली घरात.
पुन्हा गोकुळ झालं माझं घर,आनंदी आनंद सर्वत्र २७-२८ वर्षानंतर माझे घर हसले.नुकतंच कुठे माझ्या जीवनाची सकाळ झाल्यासारखं मला वाटलं. पण विधाता..त्याची नियती काही वेगळीच होती. काल त्या काळरात्रीने पुन्हा डोकं वर काढलं.कालच तू आनंदाची बातमी दिलीस की मी आजी होणार आणि रवी बाबा. पण काळाने एवढा मोठा घातला अन् यावेळी शिकार केली ती माझ्या प्रिय रवीची. सर्व तसेच घडले अगदी त्याच्या बाबांसारखे.अपघातात कायमचा सोडून गेला रवी.

त्याची एकमेव आठवण तुझ्या उदरात टाकून..आणि तुला मला कायमचे पोरकं करून… मी भोगलेले दुःख तेच पुन्हा तुझ्या वाटेला. कसं !!!कसं !!!सहन करशील ग तू ???
‘काळ हेचऔषध’पुन्हा कामी येईल का??? आतातरी तुझ्या कोणत्याच प्रश्नाचे उत्तर माझ्याजवळ नाही. अवघ्या दीड वर्षातच तुझे पांढरे कपाळ पाहणे माझ्या नशिबात होते. मी जगले पण तू कसे गं जगशील पोरी??. काळ बदलला आहे रे आता. मराठीचे शिलेदार समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांनी आज बुधवारीय काव्य रत्न स्पर्धेसाठी “काळ हेच औषध”हा अतिशय मर्मभेदी विषय दिला.. तसं पाहता विषयाची व्याप्ती खूप खोल व रुंदी ही तितकीच आहे.

पण रसिक,.सारस्वत मंडळी, तुम्हीही प्रतिमेचं दुसरं नाव आहात तेव्हा अनेकाविध मर्मभेदी रचनांनी काव्य आसमंत खुलला. प्रत्येकाने विषयाला न्याय देऊ मराठी साहित्याच्या श्रीमंतीत भर घातली.तुम्हा सर्वांचं मनापासून अभिनंदनन व पुढील साहित्यप्रवासाला खूप खूप शुभेच्छा…!

सौ सविता पाटील ठाकरे,सिलवासा
मुख्य परीक्षक, प्रशासक,लेखिका
मराठीचे शिलेदार समूह

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles