शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धेच्या विजेत्यांच्या रचना

*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*☄विषय : शून्य प्रहर☄*
*🍂शनिवार : २३ / डिसेंबर /२०२२*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*शून्य प्रहर*

इथे अनेक प्रश्न प्रलंबित
ज्याला वाचा फुटत नाही
प्रश्नोत्तराच्या शून्य प्रहरात
त्यालाच वेळ भेटत नाही.. //

धरणे,आंदोलने,मोर्चे,संप
कुठे ना कुठे रोज होतात
ज्यांच्या निवेदनांची पत्रे
कचरा टोपलीत जातात.. //

जीवघेण्या व्यथा वेदनांचे
ज्याच्यात दाखले असतात
पर त्याची सरकार दरबारी
वेळीच दखल घेत नसतात.. //

इथे अन्याय, अत्याचाराचा
वर्षामागून वर्षे होतोय कहर
ज्यावर आवाज उठवण्यास
तरीही असमर्थ शून्य प्रहर..?.. //

न्यायाच्या प्रतिक्षेत सामान्य
जीवानिशी अनेक जाताहेत
अन् राज्यकर्ते विधानसभेत
आपसात गोंधळ घालताहेत.. //

इथे खुर्ची राखण्याची लढाई
रोज इमाने इतबारे लढताहेत
ज्याला दिवसाचे सारेच प्रहर
या नेत्यांना अपुरेच पडताहेत.. //

आहे कशाला हा शून्य प्रहर
हेच पिडितांनाही कळत नाही
जेथे जीवघेण्या प्रश्नांचे उत्तर
जीव गेला तरीही मिळत नाही.. //

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔸☄️🔸➿➿➿➿
*शून्य प्रहर*

जीवन एक शून्य प्रहर
घडवले तसे घडते
विचारांचा आहार
माध्यान्य गाठते ॥१॥

तारूण्य जाते निघून
पाचवीला ललाटी
सटवाई जाते लिहुन
क्लेष येती वाटी ॥२॥

क्षणभर थांबावं वाटत
शांत कराव वाटत
चिंतामुक्त व्हाव वाटत
विसावास वाटत ॥३॥

हरवला शून्य प्रहर
आज शोधावा वाटत
प्रेम थोडंसं स्वत:वर
करावंसं वाटत ॥४॥

अपेक्षांचं ओझ
फेकावास वाटत
सोडून तुझ-माझ
स्तब्ध व्हावस वाटत ॥५॥

*श्रीमती नीला पाटणकर,शिकागो.*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿🔸☄️🔸➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध १११ साठी साहित्य पाठवून उपकृत करावे. कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ३.०० पर्यंत पाठवावे. विजेत्यांनी कधीतरी निवडलेली रचना साप्ताहिकासाठी पाठवावी (सूचना काळजीपूर्वक वाचावी. ३१ मार्च रोजी वार्षिक सभासदत्व संपलेल्या सदस्यांनी पुनर्नोंदणी करावी)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿
*शून्य प्रहर*

सुरू होता मंत्र्यांच्या प्रश्नांचे कहर
त्यानंतर येतो संसदेत शून्य प्रहर

दहा दिवसाआधी द्यायाची सूचना
मग संसदेत या प्रश्नांना येतो बहर

तोंडी, लिखित वा स्थायी अस्थायी
संसदेत प्रश्नांना कुठेच नसतो ठहर

भल्यासाठी कुणी मांडतो मौलिक
तर कुणी अकारण ओकतो जहर

मोर्चे येती आपली घोषवाक्ये घेऊन
आणि मंत्र्यांनी दुमदुमते नागपूर शहर

काही होते ठराव पास काही नापास
अशी येते हिवाळी अधिवेशनाची लहर

*मोहिनी निनावे*
आनंद नगर, नागपूर.
*©️ सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔸☄️🔸➿➿➿➿
*शून्य प्रहर*

निरोप तुझा घेताना
उलटून गेला शून्य प्रहर
हुंदका दाटला मनी
अश्रू झाले अनावर

माझ्या आयुष्याच्या वाटेवर
तुझे हृदय माझा विसावा
वाटे दुरावा ना येऊ कधी
प्रीतगंध सदा बहरावा

तुझ्या आठवणीच्या हिंदोळ्यावर
आजही मन माझे विसावते
चातकाप्रमाणे तुझ्या
प्रीत पावसात चिंब चिंब न्हाते

अजूनही मी जगते
आहे शून्य प्रहरात
तुझ्याच अवीट आठवणी
माझ्या हृदयाच्या गाभाऱ्यात……..

*सौ. स्नेहल संजय काळे*
*फलटण सातारा*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔸☄️🔸➿➿➿➿
*”शून्य प्रहर”*

आयुष्याच्या एका वळणावर
मज लाभला एक शून्य प्रहर
ध्येयवादी माझ्या जीवनाचा
घेतला धांडोळा मी सत्वर ||१||

त्या शून्य प्रहराच्या समयी
मी माझी जमापुंजी पाहिली
स्वानंदाच्या उंबरठ्यावर तेव्हा
जीवन नौका उभी राहिली ||२||

मिळविला मी आत्मानंद
सुखी जाहला मम प्रवास
नाही बागळली लालसा कधी
नव्हताच कधी अति हव्यास ||३||

शून्य त्या प्रहराच्या क्षणी
मंत्रमुग्ध मी असा झालो
यशोशिखरी माझी कारकीर्द
याची डोळा मी अनुभवलो ||४||

शून्य प्रहर मज घेऊन गेला
मग भूतकाळाच्या वाटेवर
झालो स्वार मी तत्क्षणीच
अत्युच्च परमानंदाच्या लाटेवर ||५||

सात्विक माझी जीवनशैली
उपहासाचा कधी नव्हता स्पर्श
आनंदाचे दान होते पदरी
जरी आव्हानांचा होता संघर्ष ||६||

काळजात कोरलेल्या जखमांचा
होतो मीच एकटा साक्षीदार
ढळलोच नाही तत्वांपासून दूर
झालेत जरी अघोरी प्रहार ||७||

उभा आजही ताठ मानेने
कीर्तीच्या उंच कळसावर
जिद्दीच्या जोरावर इच्छाशक्तीने
घडलो स्वतःच्या भरवशावर ||८||

एक शून्य प्रहर दाखवून गेला
माझी आयुष्यभराची कमाई
कमावली मी जी नाती अनमोल
होती हीच माझी खरी पुण्याई ||९|

जीवन माझे सार्थ झाले
क्षणात सरले माझे मीपण
सुखावला मग जीव माझा
झाले जन्माचे संकीर्तन ||१०||

असा शून्य प्रहर एक आला
स्वत्वाची जाणीव देऊन गेला
आयुष्यातल्या हरएक क्षणाची
सुंदर फुलमाला ओवून गेला ||११||

*श्री.पांडुरंग एकनाथ घोलप*
*ता.कर्जत जि.रायगड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔸☄️🔸➿➿➿➿
*शून्य प्रहर*

शून्य प्रहर अनुभव सुंदर
आजमवा सहज जरूर !

विशेष कष्टाचे भागीदार
कधी बनावे हमसफर !

जीवनाच्या याच वाटेवर
करायचा प्रवास बरोबर!

जोडली कधी शून्य प्रहर
नाही कळले हे खरोखर!

बेतले जर कधी जीवावर
कोमेजला जर हा शृंगार

सुरू होते रात्री बारानंतर
सत्य कर्माची शून्य प्रहर!

सत्याचे स्वप्न करा साकार
जीवनात संघर्ष वारंवार !

साधा सरळ केला विचार
नाही मानायची कधी हार!

चढायचे यशाचे उंच शिखर
पायरी पायरीने हळुवार !

बदलली लवकर ही नजर
दिसतो मला शून्य प्रहर !

पहाटेची हवा ही थंडगार
रोम रोम उभा रे अंगावर !

शर्थीने जिंकायचे मजेदार
प्रेमाचा ओलावा रंगदार !

भल्या पहाटेची शून्य प्रहर
ब्रम्ह मुहूर्ताची खरी सफर!

प्रेमाची अनुभूती घ्या निरंतर
देवा चरणी अर्पण वारंवार!

दोन डोळ्यांची शून्य प्रहर
सजविले कसे हे घरदार !

शून्य नजरेची शून्य प्रहर
मना मनात शांती सागर!!

*श्री अशोक महादेव मोहिते*
बार्शी जिल्हा सोलापुर
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔸☄️🔸➿➿➿➿
*शून्य प्रहर*

शून्य प्रहरी प्रमाणेच
नव्हते डोक्यात काही
माझं ही डोकं होतं
भोपळ्यापरिच बाई

उचलली ती जीभ
अन् लावली टाळूला
बेभान होऊन निघालो
मी साहित्य संमेलनाला

जावं कुठे नि
करावे तरी काय
प्रवास संपलाय तरी
डोक्यात येत नाय

बदलला मी निर्णय
शेवटी उक्ती सुचली
प्रवास पुन्हा सुरू झाले
टाळीवर टाळी बसली

जाऊन पोहचले तिथे
जिथे जायचे नव्हते
करणार काय शेवटी
वेळ काढायचे होते

सुद आली डोक्यात
अन् मी ही भानावर
करणार नाही चूक
हात ठेवले कानावर

शून्य प्रहरात असतो
तेव्हा सुचे ना काही
विचारांचे थैमान डोक्यात
काय करावे काय नाही

*चंदू डोंगरवार अर्जुनी मोर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🔸☄️🔸➿➿➿➿
*शुन्य प्रहर*

शुन्य प्रहरात
असते डोके खाली
काय करायचे ते
आठवण आली

नको ते घडले
काय ते झाले
घडायला नको होते
अन् तेच घडले

होतो चिंतनात
आले. मनात
तेच केले मी
स्वतःच्या जिवनात

हसमुख सदा
असते मी,,,
वाईट गोष्टींना
पाहत नसते मी

जे झाले तेव्हा
वेळ गेली निघून
चाचपडत बसले
त्या वेळेला बघून

शुन्य प्रहर माझा
असाच गेला निघून
दमून थकले मी
केला मनोरंजन

*केवलचंद शहारे,सौंदड गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔸☄️🔸➿➿➿➿
*शून्य प्रहर*

वाचून प्रतिसाद नाही
शून्य प्रहर आला वाटते
मग शब्द ही माझे
नकळत पेनातच गोठते

किती केली विनवणी
सांगितले भाषणी एकदा
काहीच फरक पडत नाही
मीच हरलो बहुधा

नाही घेतले विकत
सत्कार सोहळे आहे
तुमच्या कौतुकाची थाप
समजतो सत्कार माझा आहे

तिथेही का कंजूषपणा
हा समूह प्रगल्भतांचा आहे
मग कौतुक करतांना
का एकमेकांची वाट पाहे

मी मांडली आपली व्यथा
समजून हा शून्य प्रहर आहे
जरी हा विषय पटलावर
वारंवार आला आहे

*डॉ. संजय भानुदास पाचभाई नागपूर.*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔸☄️🔸➿➿➿➿
शून्य प्रहर

विचलित होत मन
धावत होत सैरभैर
फक्त विचार मरणाचा
रात्र ती होती वैर

शुन्य प्रहर तो स्तब्ध
छातीचे ठोकेही थांबले
घडीचा हले ना काटा
अश्रुही नयनी कोंबले

दारी उभा यमराज
अगतीकतेची तडफड
नेण्यास तयार ना तो
माझी जाण्याची धडपड

देवालाही नाव ठेवणारी
जात पापी मनुष्याची
हिशोब त्याचा मजजवळी
मोजतो आहे कवडी कवडी

ज्याचे कर्म निर्मळ
नेण्यास मन ना धजावे
दुसऱ्यांचे बोलण्या खातर
सरणावर तु का सजावे

क्षणीक शून्य प्रहरी
सांगितले जगण्याचे मर्म
शून्यासवे एक अंक कर्माच
मानुसकी जपने हाच धर्म

*सौ रुपाली म्हस्के मलोडे गडचिरोली*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖

*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏

➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles