किल्ले यशवंतगड (नाटे); स्वाती मराडे-आटोळे

किल्ले यशवंतगड (नाटे)पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

रत्नागिरी जिल्ह्यातील अर्जुना नदीच्या काठावर नाटे गावात वसलेला किल्ला म्हणजे यशवंतगड. नाटे गावात रस्त्याला लागूनच भगवा ध्वज लावलेला बुरुज दिसतो. किल्ल्याजवळील मुसकाजी बंदरातून अर्जुन खाडीमार्गे राजापूर बंदरात मालाची वाहतूक केली जात असे‌. त्यावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधला असावा. या गडाला बालेकिल्ला असून चार दिशेला प्रवेशद्वार आहेत. हा किल्ला गर्द वनराईने वेढलेला आहे. कोकणात सापडणा-या जांभा दगडामध्ये यशवंतगडाचे बांधकाम केले आहे. त्यामुळेच तेथील भव्य तटबंदी आजही पहायला मिळते. किल्ल्याजवळ चार फूट रूंद व सहा फूट खोल खंदक आहे. शत्रू थेट गडाच्या तटाला भिडू नये यासाठी खंदकाची योजना केलेली असते. खंदकात उतरूनच किल्ल्यात प्रवेश करावा लागतो. सर्वप्रथम दिसते ते सिद्धपुरूषाचे मंदिर. पुढे गेल्यावर नजरेस पडतो खंदकाच्या भिंतीवर कोरलेला हनुमान. हनुमानाचे दर्शन घेऊन पुढे गेल्यावर दिसते ती खंदकात कोरलेली विहीर.

खंदकातील प्रवेशद्वारापाशी दोन बुरूजात लपवलेले प्रवेशद्वार आहे. येथून आत गेले की पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. पुढे गेल्यावर किल्ल्याच्या मध्यभागी मोठा बुरुज दिसतो. त्यावर चढण्यासाठी पायऱ्या आहेत. याचा उपयोग किल्ल्यात सर्व ठिकाणी तसेच बाहेर लक्ष ठेवण्यासाठी केला जात असावा. बुरुज पाहून खाली उतरून तटबंदीवरुन झेंडा लावलेल्या बुरुजावर जाता येते. हा बुरुज पाहून खाली आले की दोन कोठारे व विहीर दिसते. हे सर्व पाहून परत मध्यभागी असणाऱ्या बुरूजाजवळ आले की उजव्या बाजूने झाडीतून खाली उतरल्यावर पडकोटाचा दरवाजा दिसतो. पडकोटात आमराई व दाट झाडी वाढलेली आहे. पडकोटातून उजव्या बाजूस पठारावर पसरलेली तटबंदी दिसते. तिच्या बाहेरील बाजूस खंदक आहे. तटबंदी संपते त्याठिकाणी बुरूज आहे. बुरूजापासून तटबंदी खाली उतरत खाडीपर्यंत आहे. खाडीवरील तटबंदीवर गेल्यास किल्ल्याचे महत्व व ठिकाण लक्षात येते. येथे जाण्यासाठी रत्नागिरीहून पावस -आडिवरे-नाटे आंबोळगड किंवा राजापूर-नाटे-आंबोळगड असे जाता येते. रत्नागिरीपासून ५१ किमी व राजापूर पासून ३० किमीवर हा किल्ला आहे. गडावर खाण्याची अथवा पाण्याची सोय नाही. परंतु गडालगत भरपूर हाॅटेल आहेत.

स्वाती मराडे-आटोळे
इंदापूर पुणे
सहसंपादक, साप्ताहिक साहित्यगंध

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles