मी कविता लिहितो

मी कविता लिहितो…पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

मी कविता लिहितो
शब्दांच्या विश्वात वावरतो…

कविता स्फुरते अंतरातून
भावनिक असते साद,
आनंद साचतो कधी उरी
कधी दुःखाचे पडसाद…

निसर्गपूजक मी खरा
निसर्गाशी एकरूप होतो,
शब्दांचे दान कवितेतून
मी ओतप्रोत भरून देतो…

रमतो कधी एकातांत मी
डोकावतो मग अंतरात,
तेव्हा स्मरते कविता
जाणिवेच्या स्पंदनांत…

विश्वाचे अनाकलनीय गूढ
उकलण्याचा प्रयत्न होतो,
विज्ञानवादी कवितेचा मग
सुरू महायज्ञ होतो…

प्रितीच्या गावी जेव्हा
सहज सफर होते,
मनाच्या गाभार्‍यातून मग
प्रेम काव्यरचना स्फुरते…

निर्माता विश्वाचा जो
त्याच्या उपकाराने घडतो,
झुकते मान त्याच्या चरणी
गुणगानाचे कवित्व करतो…

माणसांच्या गर्दीत जेव्हा
मी संचार करतो,
सुखदुःखात सहभागी होतो
भावना काव्यात गुंफतो…

राहो अबाधित माझे
कवित्व हे निरंतर,
असो काव्यरचनेचा कितीही
प्रवास जरी खडतर…

मी कविता लिहितो
शब्दांच्या विश्वात वावरतो,
शब्द प्रभुत्व माझे
जीव लावून सावरतो…

पांडुरंग एकनाथ घोलप
कर्जत,रायगड

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles