आवरा आवर

आवरा आवर



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

कीतीदा बघितलं आहे
आवरा आवर करतांना
नेत्रातल्या पाणावल्या कडा
पटकन मोत्यात बदलतांना

मनाला न उकलनार कोडं
तुझ हे रहस्यमय जगणं
कस जमतय ग हे तुला
स्व दुःख विसरून हसणं

घरच्या सगळ्यात असुनही
असतेस कितीदा अलिप्त
थोड पण कळू देत नाहीस
मनातल सार ठेवतेस गुप्त

अनेक सुप्त ईच्छा तुझ्या
स्वयंपाकघरात डब्यात बंद
मनातली आवडीचे  व्यंजने
चुलीत पेटवीलीस मंद मंद

बंद डब्यातल्या ईच्छा तुझ्या
कधीच कुणाला दिसल्या नाही
तुझ्या जळणाऱ्या त्या व्यंजनाचा
करपलेला वासही आला नाही

सांग ना ग मला प्रीये
अशी कशी आवरा आवर करतेस
माझ्या फाटक्या संसाराच्या झोळीला
अशी कशी हसुन शिवतेस
अशी कशी हसुन शिवतेस

रुपाली म्हस्के मलोडे, गडचिरोली

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles