काळ हेच औषध

काळ हेच औषध



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

विसरू म्हटले तरी
विसरत नाही कांही
काळ हेच औषध
विसरू पाही कांही बाही ॥१॥

गत काळातील
कटू आठवणी
मनी भेडसावतील
करू नये त्याची साठवणी ॥२॥

नव्याला उजाळा देत
काढाव्या गोड आठवणी
काळ हेच औषध असत
नको ती कटू उजळणी ॥३॥

काढून कटू आठवणी
नाही आठवून मिळत उत्तर
घालता गगनाला गवसणी
दाटुन येतो गहिंवर प्रत्युत्तर ॥४॥

घेऊन माग चौफेर
पदरी पडत कोर माप
दु:ख होते अनिवार
काळ हेच औषध अमाप ॥५॥

श्रीमती नीला पाटणकर,शिकागो.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles