मानवी जीवन ‘चित्र सावली’चा अजब गजब खेळ”; विष्णू संकपाळ

“मानवी जीवन ‘चित्र सावली’चा अजब गजब खेळ”; विष्णू संकपाळपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

शुक्रवारीय हायकू काव्य परीक्षण

*सत्य अज्ञात*
*नसे खंत ना खेद*
*छाया उमेद*

मानवी जीवन एक अजब गुंतागुंतीचे गजब कोडे. जितके सोडवावे तितके थोडे. कुतुहल संपता संपत नाही, प्रयत्न थांबता थांबत नाही, कधी यश कधी अपयश हार मानता मानत नाही. जीवनरूपी प्रवासात सावलीसारखी साथ देणारा साथी असेल तर संकटाचे पहाडही लिलया पार करता येतात. मात्र मागे पुढे कुणीच नसेल तर नंदनवनातील हिरवळही काटे बनून टोचतात. आपल्या मागे कुणीतरी आहे, तो जवळ असो की दूर त्याचा हात पाठीवर आहे हा विश्वासच आश्वस्त करतो. खवळलेल्या सागरात एखादा तिनखा ही पुरेसा असतो ज्याच्या आधाराने लाटावर स्वार होता येते.. मात्र असे कांहीच प्रत्यक्षात हातात नसेल तर…?

*खचता धीर*
*सावलीचा आधार*
*वाहते भार*

तर मात्र तसे कोणीतरी अप्रत्यक्षपणे आपल्या मागे उभे आहे. हा अदृश्य चित्र सावलीचा भास सुद्धा हत्तीचे बळ देऊन जातो. हा विश्वास इतकी कमाल करून जातो की, कधी कधी आपण असहाय, दुर्बल असलो तरीही त्या सुप्त प्रेरणा शक्तीच्या बळावर प्राप्त परिस्थितीवर मात करून पुढे जाऊ शकतो.
समूह प्रमुख आदरणीय राहुल दादा यांनी काल शुक्रवारीय हायकू स्पर्धेसाठी एक असेच सावलीचे गूढ चित्र दिले होते. त्याचे बारकाईने निरीक्षण केल्यास जीवनाचा कार्यकारणभाव लक्षात येईल. दोन सावल्या… एक प्रवास. खूप काही सूचित करणारे हे चित्र,मानवी जीवनातील दृश्य अदृश्य घटनांचे प्रतिनिधीत्व करणारे आहे. त्याचा मागोवा घ्यायचा झाल्यास.
“मानवी जीवन एक अजब गजब चित्र सावलीचा खेळ” असल्याचे प्रत्यंतर येते.
संघर्ष पथावर चालताना कोणत्याही परिस्थितीत हात न सोडणारी साथ असेल तर त्या कष्टाचे साफल्य होतेच. मात्र कधी कधी अशी समर्थ साथ संगत आपल्या पासून खूप दूर असते. तेव्हा ती जिथे असेल तिथूनही आपल्यासाठी काहीतरी करेल हा चित्रसावलीचा आभास ही स्फुरण देवून जातो.
*आहेस मागे*
*हाच सतत भास*
*चालले पुढे*

या विषयाला सर्वच हायकूकारांनी आपापल्या परीने गवसणी घातली. तरीही एक गोष्ट आवर्जून सांगाविशी वाटते की.. हायकू रचनेत, तो, ती, हा, ही, हे, ते, असे भरीची एकाक्षरे नसावीत.. उदा. ते आकाश, ती धरा, ही नदी, ती सावली, तो अंधार वगैरे वगैरे…
मात्र परिणामकारक कलाटणीसह हायकू निर्मिती करताना चित्राच्या पलिकडले भाव शब्दात पकडण्याचा प्रयत्न करावा…सर्वांना शुभेच्छा!
आज मला परिक्षण लिहायची संधी दिल्याबद्दल आदरणीय दादांचे मनःपूर्वक आभार..

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*सदस्य मराठीचे शिलेदार समूह*

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles