शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धेच्या विजेत्यांच्या रचना

*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट सात🎗🎗🎗*पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*☄विषय : सरते वर्ष☄*
*🍂शनिवार : ३० / १२ /२०२३*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*सरते वर्ष*

पुन्हा एकदा घड्याळाचे
काटे पुढे पुढे सरकले
सुखदुःखाचे क्षण देऊन
पाहता मनोमनी चरकले

सरले दोन हजार तेवीस
आठवणींचा बांधला पेटारा
काय सोडू काय धरून ठेवू
केला सगळ्या कर्माचा निपटारा

हरवले असेल कुणाचे
कुणा गवसले असेल काही
हिशोब ठेवता ठेवता कसा
कधी ताळेबंद चुकत राही

रूसवे फुगवे सोडुन सारे
जाऊ या सामोरे हर्षाला
मतभेद द्वेष इथेच गाडून
देऊ निरोप सरणाऱ्या वर्षाला

मावळत्या सुर्याची किरणे
सरते वर्ष हा अंत नाही
उद्या सकाळी पहाटवारा
नवजीवन घेऊन वाही

*सविता धमगाये ,नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌸🙏🌸➿➿➿➿
*सरते वर्ष*

आल बघता बघता
सरत्या वर्षाच पान
काय हाती आलं
1आठवलं चांद्रयान ॥१॥

सरते वर्ष मागे गेल
ठेवून आठवांच गाठोड
पुढील पानी जाताना
सामोर आलं स्वप्नांचं बाड ॥२॥

काय झाले काय नाही
ते स्मरून पाहीले
कटु काळाचे दिवे
सारे मालवून टाकले ॥३॥

निरखता बारा पानांवर
बराच बदल दिसला
अनुभवी मुखडा माझा
मनात मलाच हसला ॥४॥

सरत्या वर्षांला
करून रामराम
नववर्षाचं करू स्वागत
जोमानं ठोकून सलाम ॥५॥

*श्रीमती नीला पाटणकर,शिकागो.*,
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿🌸🙏🌸➿➿➿➿
*सरते वर्ष*

क्षण आला निरोपाचा
वजाबाकी बेरजेचा
घेऊ आढावा पुढचा
नव्य नव्या योजनेचा—/१/

दुःख आयुष्यात आले
केला समतोल पाया
भर सुखाने घातली
गेली मोहरून काया—/२/

झाली चंद्रयान नोंद
विश्व विक्रम करूनी
करू संकल्प नव्याने
मात संकटी देऊनी—/३/

निसर्गाचा भारी कोप
कोण करील संहार
बळीराजा दिसे दुःखी
केला काळाने प्रहार—/४/

झाला स्त्रीत्वाचा तो खून
माता भगिनी दिसता
अपमान जिथे तिथे
जसा वनवा पेटता —/५/

नको आठवांचा भार
देऊ निरोप सुखाने
विस्मरून सारे काही
टाकू पाऊल मानाने—/६/

गीत ओठावर नवे
गत सुखदुःख धून
वर्ष सरते जाताना
नको डोई जुने ऋण—/७/

*रेखा सोनारे*
*ता जि नागपूर*
*©मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌸🙏🌸➿➿➿➿
*सरते वर्ष*

वर्षा मागून वर्षे गेली
गोड आठवणी ठेवून
सरत्या वर्षाला निरोप
दुःखदायक बाबी विसरून

नव्या जुन्याची घालू सांगड
सरत्या वर्षाला निरोप देऊन
सन दोन हजार चोवीसात
जल्लोषात साजरा आनंदान

नव्या आशा आकांक्षा घेऊन
विचारांना तिलांजली देऊ
चालना देऊन नव विचारांना
समाज रक्षणाचे विचार घेऊ

निसर्ग बदलाप्रमाणे ऋतुबदल
काळाबरोबर आपणही बदलून
जुन्या नव्या चा स्वीकार करून
सुखद आनंदी करू जीवन

लागली नववर्षाची चाहूल
चैतन्य भरत असे मना मनात
मिटवून घेऊ भेद आपल्यातील
नात्याचा आपलेपणा ठेव हृदयात

*सौ.कुसुम पाटील कसबा बावडा कोल्हापूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌸🙏🌸➿➿➿➿
*सरते वर्ष*

आठवांच्या सुगंधी कुपीत
समावत‌ आहे हे सरते वर्ष…
नववर्षाच्या आगमनाचा
सर्वांच्याच मनात आहे हर्ष…

सरत्या वर्षाचा घेऊया मागोवा
जुन्या घटनांची करू पुनःउजळणी..
क्लेश देणारे विसरून दुःखी प्रसंग
सुखदायी आठवणी ठेवूया स्मरणी…

किती हरवले, किती गवसले
किती सोडून गेले देवाघरी..
किती नवांकुर जन्माला आले
क्षणात फिरले सारे चित्रपटा परी..

सूर्य तळपतो , चंद्र चमकतो
पसरतात तारका नभांगणात..
तसाच नव वर्ष घेऊन येऊ दे
सुख, समाधान सर्वांच्या जीवनात..

नवीन दिवस नव प्रभात
मनी सजल्या नव्या कल्पना..
माणुसकीचे अवलंब करूनी
जपू या आपुलकीच्या भावना..

आरोग्य अन् चैतन्यमयी असो
सर्वांना येते वर्ष हीच मनोकामना.
सरत्या वर्षाला देऊनी निरोप
नववर्षच्या सर्वांना खूप शुभकामना..

*सौ.मृदुला कांबळे गोरेगांव -रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🌸🙏🌸➿➿➿➿
*सरते वर्ष*

तू आलास तेव्हा
जुनाच संकल्पाचा पाऊस होता
नव्या वर्षाचे नव दिवस
जो तो उन्मादात नाचत होता

जसजशी नव वर्षाची किरणे
दारात थबकत होती
हळूहळू एकेक संकल्प
नकळत मोडत होती

पुन्हा तेच रहाटगाडगे
आम्ही ओढत होतो
तेच तेच रडगाणे
आम्ही सांगत होतो

सुख दुःखाची उन सावली
लपंडाव खेळत होती
मृगजळामागे धावता
सुख निसटून जात होती

निघून गेल्या तारखा
सरते वर्ष आले
केले तेच पुन्हा संकल्प
जे मुद्दाम विसरून गेले

*डॉ. संजय भानुदास पाचभाई नागपूर.*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌸🙏🌸➿➿➿➿
*सरते वर्ष*

“प्रत्येक वर्ष येते नि जाते
काही पाऊल खुणा ठेवून ”
“कालांतराने हेच वर्ष
भूतकाळात बसते जाऊन ”

“सुख आणि दुःख हे नेहमी
सर्वांच्याच वाट्याला येते ”
“काहींना सुख तर काहींना
दुःख सरते वर्ष देऊन जाते ”

“सत्तांतर,पक्षांतर,पक्षफुटी,
बंडखोरी हे तर नित्याचे झाले ”
“सरते वर्ष आरक्षण आणि
आरक्षण बचावात मात्र अडकले ”

“नवीन वर्षात जुनेच मुद्दे
घेऊन आरक्षण मुद्दा गाजणार? ”
“जनतेच्या रेट्यापुढे नक्की
कोणाची तरी पोळी भाजणार?”

“सरते वर्ष दुष्काळ,पाणी टंचाई
राजकीय अस्थिरता देऊन गेले ”
“शिक्षणक्षेत्रात मात्र प्रशिक्षणाने
शिक्षणालाच नवे पंख फुटले ”

*✍️श्री हणमंत गोरे*
*मुपो :घेरडी, ता :सांगोला, जि :सोलापूर*
*(©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह )*

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖

*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏

➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles