नात्यांमध्ये ‘ स्पेस ‘ हवा…!!

नात्यांमध्ये ‘ स्पेस ‘ हवा…!!



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

चलो एक बार फिर से
अजनबी बन जाये हम दोनो….

असेच काहीसे…नाते. मग ते कोणतेही असो, नात्यांमध्ये ‘ स्पेस’ असायला हवा.मग ते नाते कितीही प्रेमाचे असो, मैत्रीचे असो की मतभेद होणारे असो.. काही दिवस एकमेकांपासून दूर राहिले की नाते कसे ‘रीफ्रेश’ होते, भावना कशा उचंबळून येतात ते पहाच. एकमेकांमधील दूरी प्रेम वाढवते आणि आपापसात मतभेद असतील तर विसराळी पाडण्यासाठी हा प्रयोग नक्की करू शकता. मतभेद दूर होणारच…!

प्रत्येकाचे काही वैयक्तिक विचार, इच्छा, आकांक्षा असतात.पण त्या नात्यांचे समायोजन ( ॲडजेस्टमेंट) करण्यामध्ये मागे पडत असतात. आपल्याला त्यांच्याकडे पहायला वेळ ही नसतो. नव्हे त्यांना आपण विसरूनही जातो. इतकेच नव्हे रोजचे आयुष्य घ्या…आज थंडी आहे थोडे उशिरा उठू यात,आज कंटाळा आला दुपारी थोडे झोपू. आज मस्त टी.व्ही. पाहू यात,चला आज मित्रांबरोबर थोडा वेळ घालवू या…पण…हा जबाबदारी चा पण ह्या साध्या सोप्या ईच्छा सुद्धा पूर्ण करू देत नाही आणि या गोष्टींचा विचार करण्यासाठी कोणाकडे वेळ पण नसतो… वाचताना क्षुल्लक वाटतील या ईच्छा पण विचार करा… होतात का पूर्ण? नाही ना?

जीवनाची गाडी सतत एकाच रूळावर प्रवास करत असेल तर कंटाळवाणा प्रवास होणारच.मग थोडा वेगळा विचार करू या… थोडे वेगळे जगून बघू या.. वेगळी माणसे… वेगळा आभास… वेगळे वातावरण.मग पहा नात्यांना कसा प्रेमाचा नवा मुलामा चढतो. एक आदर्श जोडपे पाहण्यात आले, खूप प्रेम एकमेकांबद्दल.. पण सुट्टीचे दोन महिने ते एकमेकांपासून इतके दूर राहतात की त्यांच्यात कोणताही कॉन्टॅक्ट नसतो… वाटले ना अशक्य? पण हे खरे आहे.. एकमेकांना माहित नसते ते कुठे आहेत आणि काय करत आहेत, आहे कि नाही आश्चर्याची गोष्ट… असो आपण हा प्रयोग चार दिवस तर करून पाहू शकतो ना? ते जोडपे म्हणते आम्ही या दोन महिन्यांत एक वेगळीच ओढ,चकाकी आमच्या नात्याला देत असतो जी आम्हाला वर्षभर पुरते.

कधी कधी रोज तेच ते म्हणून नाते बोजड वाटायला लागतात, कंटाळवाणे होतात.असे वाटलेच कधी तर, मग ‘स्पेस’ द्यायला काय हरकत आहे? पानगळतीनंतर येणारी नवपालवी म्हणजेच ‘स्पेस’ नंतरचे नाते म्हणावयास हरकत नाही. मग काय? आहात ना तयार…. नात्यांमध्ये ‘स्पेस’ देऊन नाते नव्याने फुलवायला?

शर्मिला देशमुख -घुमरे, बीड
=========

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles