वळण

वळणपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

वंदनाची मनातली मनात धुसफुस सुरू होती. घरची कामे भरभर आटोपून चार घरापुढे असलेल्या रंजना नावाच्या मैत्रीणीकडे ती जाऊन आली, तेव्हापासून तिच्या डोक्यात काहीतरी सुरु होते. लगबगीने कामे आटोपून ती बसली. पण काय करावे तिला सुचेना? मन अस्वस्थ होते कुठल्यातरी विचारात ती गर्क होती. घड्याळाकडे सारखी बघायची. सहा वाजता वसंता घरी आला. तिने स्वंयपाक खोलीत जाऊन चहा केला. चहा घेऊन त्याच्यापुढे उभी राहिली पुन्हा किचनरुम मधील कामे आटोपून पुन्हा वंसतरावाजवळ उभी राहून जमिनीवर पायाच्या बोटानी फरशीवर गिरवू लागली. स्वंयपाक आटोपून सर्वांचे जेवण झाले.दहा वाजता बेडवर जाण्यापूर्वी विचारावेसे वाटत होते, पण हिम्मत न झाल्यामुळे ती पण झोपी गेली. दुसर्‍या दिवशी हिम्मत करत ती वसंतास म्हणाली ” मला तुम्हाला एक विचारायचे आहे” ते म्हणाले, “विचार की काय ते ?”

“एक खेळायचा ग्रुप आहे त्यात भाग घेऊ इच्छिते. मी लहानपणी धावणे, लांबउडी खूप छान खेळत होते. काल मी रंजनाकडे गेले होते तेव्हा ती म्हणाली, ‘तू सुध्दा तुझ्यातील खेळाडूचा विकास करु शकते.’ वंसता म्हणाला, “तुझी कालपासूनची लगबग, घालमेल बघत होतो तेव्हाच माझ्या लक्षात आले की हिला महत्त्वाचे काही सांगावयाचे असावे. पण तू केव्हा सांगतेय याचीच वाट पहात होतो. तुला मिळणा-या वेळेचा तू सदुपयोग करतेय याचा आनंदच आहे. तू उद्यापासून नव्हे आजपासूनच तो ग्रुप जाॅईन कर.”

आता ती उत्साहाने सकाळी लवकर उठून वाॅकिंग, रनिंग करायला जाऊ लागली. असे बरेच दिवस सराव केला. वंदनानी अॅथलेटिक मास्टर ग्रुपमध्ये रजिस्ट्रेशन केले. स्पर्धेसाठी तयारी केली. स्पर्धेचा दिवस आला. सांगली जिल्ह्यातील मिरज येथे स्टेट लेवल अॅथलेटिक गेम असल्यामुळे ती तिकडे निघाली. वंदनाची पहिलीच वेळ असल्यामुळे ती संकोचून राहायची. पहिल्या दिवशी ग्राऊंडवर मैत्रिणीसोबत खेळ बघितले. दुसर्‍या दिवशी तिची पाच किलोमीटर चालायची स्पर्धा होती. वंदनानी आपल्या वयोगटात द्वितीय स्थान पटकाविले. थाळीफेक मध्ये प्रयत्न केला पण तिचे प्रयत्न तोकडे पडले. डोळ्यात अश्रू आले पण हिम्मत हारली नाही. पुढच्या स्पर्धेसाठी स्वतःशीच ठरवले, मी गोल्ड मेडल घेणारच.

आता तिने चालण्यावरच लक्ष द्यायचे ठरवले. त्यासाठी योग्य ते नियोजन केले. ग्रुप मधील चालणा-या इतर सहका-यांसोबत अधिकाधिक सराव केला. वेळ व गती यांचा ताळमेळ घातला. गरज असेल तिथे तज्ञांचे मार्गदर्शन घेतले. या सगळ्या प्रवासात पतीची साथ होतीच. नवा आत्मविश्वास घेऊन ती स्पर्धेत उतरली नि यावेळी तिने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले. योग्य नियोजन जीवनाला अपयशाचे वळण पार करून यशोशिखरावर घेऊन जाते याचा अनुभव घेतला.

कुसुमलता दिलीप वाकडे
दिघोरी रोड,नागपूर
==========

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles