माणुसकी

माणुसकी



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

माणसाने, माणसाशी, माणसासम वागणे. हीच तर माणुसकी बरोबर ना..!! पूर्वी माणूस एकमेकांच्या मदतीला अगदी धावून जायचा. एकी दिसून यायची. पैसा, शारिरीक श्रम, एकमेकांची मुले सांभाळणे,घरात अन्न कमी पडले की त्याचे दातृत्व,एवढेच काय माणूस गेला तरी त्या घरातील चूल कमीतकमी दहा दिवस पेटत नसे.अशावेळी शेजारी पाजारी, नातेवाईक अन्नपदार्थ पुरवायचे. पण…हल्ली हे सारे दिसत नाही.शहरात तर नाहीच नाही.कदाचीत गावाकडे या प्रथा दिसतीलही पण खरचच हल्ली माणूसकी लोप पावताना आपण पाहत आहोत,.यात आपण सारे येतो.

हल्ली कोणाला, कोणाकडे जायलाही वेळ नाही. फक्त सण, समारंभ, मयत याच गोष्टींसाठी शहरातील माणसे एकत्र येतात. ती पण वेळ असेल तरच…हो..खर आहे हे. आजकाल माणूस यंत्रमानव झालाय हो.सर्व काट्याच्या घड्याळाप्रमाणे आपण जीवन जगत आहोत. कोरोनाच्या या काळात खूप वर्षांनी लाॅकडाऊनमुळे आपण आपल्याच मुलांशी मनसोक्त खेळलो.त्यांना वेळ दिला.आपल्याच सासू सासर्‍यांशी नव्याने ओळख करून घेतली.त्यांनाही वेळ दिला.पुरूषांनी आपल्या आईबाबांसाठी वेळ दिला. बायकोला वेळ दिला.

बायकांनी ,विशेषतः नोकरी करणार्‍या बायकांनी आपल्या कुटुंबासाठी वेगवेगळे पदार्थ नेटवर सर्च करून बनविले. कुटुंबात रमायला वेळ नव्हता तो वेळ यांना मिळाला. पण ज्या घरातून आयटी वाल्यांचे job सुरू होते.अशांनी देखील घरात एकमेकांना मदत करत कामाची पूर्तता केली. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पोलीस,डाॅक्टर,शिक्षक,विविध सेवा देणार्‍यासंस्था अशाअनेकांचे माणूसकी पणाचे दर्शन याच काळात झाले. काही ठिकाणी माणूसकीचा लवलेशही दिसला नाही. कारण आपल्याला कोरोना होईल बाबा! ही भीती…!! तररर अशी ही माणुसकी ..माणुसकी म्हणजे, कोणत्याही परत मदतीची अपेक्षा न ठेवता फक्त मदत करत राहणे. रस्त्यात Accident झाला तर त्या माणसाची मदत करणे. वृद्धांची काळजी घेणे.आणखी काय असते हो जीवनात…एवढे जरी जपले तरी माणूसकीचे दर्शन होईल . चला तर माणुसकीचा विडा आपण सारे मिळून उचलूया.

वसुधा वैभव नाईक
धनकवडी,जि.पुणे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles