सरते वर्ष

सरते वर्ष



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

सरते वर्ष आज ना उद्याला
सन,महिना जाईल बदलून,
जाता जाता स्मृतीचा ठेवा
मनामनात जाईल जागवून.

कटू गोड आठवणींचा इथं
हिशोब होईल अनुभवाचा,
प्रत्येक महिन्यात आलेल्या
विविध प्रासंगिक घटनांचा.

उजाळा मिळतोय स्मृतींना
चित्रपट उभाच वर्षभराचा,
काय कमविले व गमविले
ताळमेळ बसेल कर्तुत्वाचा.

देऊन गेलंय सरते वर्ष खूप
मानवी वृत्ती वाढलीय भूक,
समाधानी प्रवृत्ती नसे राही
अपेक्षाभंग नको करू चूक…

द्यावा निरोप सरत्या वर्षाला
सज्ज स्वागतास नववर्षाला,
आपापल्यापरी साकार करा
योग्य आकार द्या जीवनाला.

उगवत्याला नमस्कार आहे
मावळत्या टाकी नजरेआड,
अनुभवाची शिदोरी सोबती
जीवन नौका नेईल पल्याड.

बदलते फक्त दिनदर्शिकाचं
बाकी दिनचर्या रोजची आहे,
तरीही थर्टीफर्स्टच्या रातीला
जल्लोषाचे उधाण येते आहे.

बी एस गायकवाड
पालम,परभणी
========

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles