“माई सावित्रीच्या कर्तृत्वाचा थोडा तरी वारसा का नसावा आम्हात”?; सविता पाटील ठाकरे

“माई सावित्रीच्या कर्तृत्वाचा थोडा तरी वारसा का नसावा आम्हात”?; सविता पाटील ठाकरेपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेचे परीक्षण

“स्री जन्मा तुझी कहाणी..,
पदरात पान्हा नयनात पाणी..”

हा जरी आम्हा भारतीय स्त्रियांचा इतिहास असला तरी;
स्त्री म्हणजे जन्मदाती..
स्री म्हणजे संस्कृती..
स्री म्हणजे नाविन्याचा वसा..
स्री म्हणजे कर्तृत्वाचा ठसा..
हा आमचा वर्तमान आहे.

राजकारण, अर्थकारण, समाजकारण या आणि अशा अनेक बहुश्रुत ठिकाणी स्वकर्तृत्वाने पोचलेली भारतीय स्त्री म्हणजे आज समाजातलं मानाचं पान आहे. होय म्हणूनच तर, प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती बनल्यात. लतादीदींनी स्वरावर आधिराज्य गाजवलं. कल्पना चावलाने आसमंत कवेत घेतलं, तर मदर तेरेसांच्या रूपाने करुणेचा महासागर उभा राहिला.पण…. पण…. हे सारं कुणामुळे घडले…??? मागच्या वर्षी आजच्याच दिवशी बारामतीच्या खासदार सुप्रियाताई सुळेंचं भाषण मी ऐकलं होतं, त्यात त्या म्हटल्या होत्या. “आज मी इथे उभे राहून बोलत आहे, त्याचं श्रेय जातं ते केवळ आणि केवळ सावित्रीबाई फुलेंना,त्यांच्यामुळेच मी आज भाषण करू शकत आहे.”.

जरा आठवा तो काळ… स्री म्हणजे प्रज्योत्पादनाचं मानवी साधन, स्री म्हणजे पायाची दासी अशा भयानक मानसिकतेतून स्री समाजाला बाहेर काढण्यासाठी काम करणारी पहिली महिला शिक्षिका…म्हणजे सावित्रीबाई फुले. सनातनी समाजाचा प्रचंड विरोध झुगारून शिक्षणातून प्रतिगामी विचारांचे बी रोवणारी थोर महिला समाज सुधारक. बालवयात विधवा झालेल्या, अत्याचाराला बळी पडलेल्या स्त्रियांना हक्काचं माहेर घर उपलब्ध करून देणारी महान माता. अर्धांगवायूमुळे अंथरुणावर खिळलेल्या पतीची सेवा करणारी एक धर्मपत्नी. किती??? “किती ग गुणगान गाऊ माऊली तुझे, तुझ्यापुढे फिके आमच्या कर्तुत्वाचे ओझे.”

आऊसाहेब जिजाऊंचा समृद्ध वारसा जोपासणाऱ्या जिजाऊंच्या लेकींना आज गरज आहे ती आत्मचिंतनाची. मी नेहमीच पाहते. मुलगा होत नाही म्हणून मांत्रिक तांत्रिकाकडे जाणारी ती. पोथी, पुराण, कर्मकांड जप तप यात स्वतःला पूर्णपणे गुंतवून घेणारी ती. संकटावर मात करायचं सोडून फास घेऊन जीवन संपवणारी ती. केवळ अफवेवर विश्वास ठेवून धावत्या लोकल मधून पटापट उडी मारून मरणारी ही तीच. कशी होऊ शकते ही सावित्रीची लेक ??? स्रीत्वाची जननी आमची माऊली सावित्रीबाई असेल तर तिच्या कर्तृत्वाचा थोडा तरी वारसा का नसावा आम्हात????

आज अशा अनेक सावित्रीच्या लेकींना साहित्यरुपी व्यासपीठ निर्माण करून साहित्याच्या क्षेत्रात आत्मनिर्भर करण्याचं श्रेय जातं ते मराठीचे शिलेदार समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांना. प्रसंगोचीत योग साधून आज बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेसाठी “आम्ही सावित्रीच्या लेकी” हा विषय दिला आणि सर्व कवी आणि कवयित्रींनीही आपापल्या परीने सावित्रीबाईंचं गुणगान गायलं. खऱ्या अर्थाने त्यांच्या विचारांचं अनुसरण करणे हेच खरे अभिवादन होईल आणि यात बऱ्याच अंशी आपण यशस्वी झाल्यात तेव्हा आपल्या सर्वांचे मनापासून अभिनंदन व पुढील लिखाणास अनंत कोटी शुभेच्छा. शेवटी एवढचं म्हणेन, साऊच्या साडीवर पडलेल्या शेणाचंही खत झालं..आणि इतक्या वेली फुलल्या की प्रत्येक मुलीचं फुल झालं…हिच तिची यशोगाथा..या माऊलीस शतशत नमन..!!

सौ. सविता पाटील ठाकरे,सिलवासा
मुख्य परीक्षक,प्रशासक, लेखिका, कवयित्री
©मराठीचे शिलेदार समूह

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles