कोडापे सरांचा सेवानिवृत्तीपर सपत्नीक सत्कार

कोडापे सरांचा सेवानिवृत्तीपर सपत्नीक सत्कारपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_जि.प. प्राथमिक शाळा, निलज येथे निरोप समारंभाचे आयोजन_

जिल्हा प्रतिनिधी, गोंदिया

अर्जुनी/मोर: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, निलज येथे कार्यरत असलेल्या मुख्याध्यापक खुशाल सुकरु कोडापे यांचे नियत वयोमानानुसार ५८वर्षे पूर्ण झाल्याने, त्यांचा सेवानिवृत्तीपर सपत्नीक सत्कार समारंभ कार्यक्रम नुकताच समोरया हॉटेल-सभागृह, अर्जुनी/मोर येथे मोठया थाटात संपन्न झाला. आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा, मोरगावच्या उच्च श्रेणी मुख्याध्यापक रेखा गोंडाणे, तर मुख्य अतिथी म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मालकनपूरचे मुख्याध्यापक मोहन नाईक ,ज्येष्ठ शिक्षिका भारती रामटेके, लीना ब्राम्हणकार व अर्जुनी/मोर केंद्रातर्गत मुख्याध्यापक, शिक्षक मोठ्या संख्येने हजर होते.

याप्रसंगी सत्कारमूर्ती खुशाल कोडापे व त्यांची अर्धागिनी विणूता कोडापे यांचा शाल-श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आले . सत्कारास उत्तर देताना त्यांनीं सेवकाळातील अनेक चांगले-वाईट अनुभव कथन करून, सर्व सेवापैकी शिक्षक ही सेवा सर्वोत्तम असून ,सुजाण नागरिक घडवणारी, राष्ट्राची जडणघडण करणारी सर्वोत्तम सेवा असल्याचे कथन केले.आपल्या सेवाकाळात शैक्षणिक कार्याबरोबरच, मुतखड्यावरील रामबाण आयुर्वेद औषधीचे मोफत वितरण करून, अनेक डॉक्टर, शिक्षक, न्यायाधीश, पत्रकार,गोर-गरीब अशा अनेक क्षेत्रांतील लोकांना रोगमुक्त केल्याचे समाधान अविस्मरणीय असल्याचे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून केंद्रप्रमुख सु.मो.भैसारे यांनी सत्कारमूर्तीच्या कार्यावर प्रकाश टाकला व त्याच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू विषद केले तसेच भावी आयुष्य सुखी-समृद्ध व निरामय व्यतीत व्हावे अशी कामना केली.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पुरुषोत्तम गहाणे,जितेंद्र ठवकर यांनी केले तर आभारप्रदर्शन जी. डी. निखारे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नरेन्द्र बनकर, विनोद मेश्राम, वामन घरतकरआदींनी सहकार्य केले.सत्कार उपरांत स्नेह-भोज करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles