“नैतिकतेची पातळी ओलांडून फसलेल्या नात्याला, ‘प्रेम’ म्हणावं काय”?; विष्णू संकपाळ

“नैतिकतेची पातळी ओलांडून फसलेल्या नात्याला, ‘प्रेम’ म्हणावं काय”?; विष्णू संकपाळपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेचे परीक्षण_

“मी कशी ओळखू प्रिती हे ह्रदय म्हणू की लेणे, प्रेमाला उपमा नाही ते देवाघरचे देणे.” जगदीश खेबुडकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेले हे शब्द! १९८१ साली प्रदर्शित झालेल्या कैवारी या चित्रपटातून अजरामर झाले. आजही या गीताचे स्वर कानावर पडताच मन मंत्रमुग्ध होते. खरेच देवाघरचे देणे असलेल्या या प्रेमाला प्राप्त करण्यासाठी मात्र “दिल का दास” व्हावे लागते. कुणाला सहज साध्य होते तर कुणाचे उभे आयुष्य साधना होवून जाते. अशा प्रेमाची व्याख्या करायची झाल्यास जे त्यागाच्या समर्पणाच्या कसोटीवर उतरून कसेतरी निस्तरण्यापेक्षा, परस्परात रूजवून सर्वार्थाने विस्तारले जाते तेच खरे प्रेम असते. आणि अशाच प्रेमाची गोष्ट अमर होते.

काळाच्या ओघात आज प्रेमाची परिभाषाच पार बदलून गेली आहे. उभे आयुष्य मुलांच्या भविष्यासाठी पणाला लावणार्‍या आईवडिलांपेक्षा स्वतःचा जोडीदार निवडण्याची अक्कल स्वतःला आहे, असे समजणारी आजची पिढी सहजपणे प्रेमाच्या खेळात घरदार मायबाप सोडून परागंदा होताना दिसते आहे. मात्र यातले बाह्य आकर्षण संपून स्वभावगुणांचा प्रश्न येताच इगो जागा होतो. मग नव्याची नवलाई संपून खटके उडू लागतात. तोपर्यंत मागचे दरवाजे कायमचे बंद झालेले असतात… ही प्रेमाची गोष्ट म्हणावी का? दुसरी गोष्ट आजकाल “लिव इन”मध्ये बिंधास्त एकत्र राहणारे तरूणतरूणी कोणत्या संस्कारांचे पाईक होताहेत कळत नाही. मुलामुलीत मैत्री आक्षेपार्ह मुळीच नाही मात्र त्याच्या मर्यादेच्या लक्ष्मणरेषा जेव्हा धुसर होतात तेंव्हा मैत्रीच्या खूप पलिकडे गेलेले नाते प्रेमाच्या अलिकडे येऊन पोहचते. लुभावण्या संवादातून वाढलेले आकर्षण नैतिकतेची पातळी ओलांडून जाते आणि कधी कधी तिथेच सारे फसते. ही प्रेमाची गोष्ट म्हणावी का…?

हे वयच असे असते की कधीतरी कुणावर तरी भाळणे अटळ असते. मात्र त्यातले सांभाळणे ज्याला जमले त्याचेच भाळणे सार्थकी लागते. भावणे आणि निभावणे या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत. जाता जाता अल्पपरिचयातच सहज कुणीही भावते पण सहवासात आल्यावरच खरेखोटेपणा कळतो. तेव्हा निभावणे जड जाऊ लागताच चक्क काडीमोड घेणार्‍या प्रेमाची गोष्ट खरी असते का..?

“शनिवारीय काव्यस्तंभ” स्पर्धेसाठी समूह प्रमुख आदरणीय राहुल दादांनी ‘प्रेमाची गोष्ट’ हा विषय देऊन चांगल्याच गुदगुल्या केल्या. सर्व शिलेदारांनी या विषयात रंग भरताना, मिलन, विरह केंद्रस्थानी ठेवून खमंग, खुसखुशीत, कधी चटका लावून जाणारे शब्दलाघव पेश केले. तर काहीनी प्रेमाच्या गोष्टीचे वेगवेगळे पैलू वैविध्यपूर्ण धाटणीत शब्द बद्ध करून विषयाला नाविन्यपूर्ण गवसणी घातली. एकंदरीत आज कुणाचे गुलाब फुलले.. तर कुणाचे सुकले.. कुणाचे भाव खुलले तर कुणी मर्मभेदी घाव घालून गेले. आज मला या सुंदर विषयावर भाष्य करण्याची संधी मिळाली याबद्दल आ. दादांचा मी ऋणी आहे.

विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर
©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles