उदयास्त

उदयास्त



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

सरत्या वर्षाच्या
उत्तरसंध्येस….
तू पुन्हा साद घातलीस
अगं… मी तुझा मावळता रवी,
आज कशी मला विसरलीस…
उदयास्त तू नेहमी
माझ्या प्रतीक्षेत असतेस…
अस्ताला मात्र विरह अश्रू गाळत बसतेस…
आज मी ही जाता जाता
सोडून देईल गडे,
गतवर्षीच्या आठवणी क्षितिजापलिकडॆ…
उदयाला तूच जल अर्पित करून
तप्त होणाऱ्या देहाला आधीच
अभ्यंग स्नान घालणार..
तुझ्या समर्पणातूनच मी ही
पुन्हा रोजच उगवणार…
उदयास्त जरी तू आणि मी
युगानुयुगे आपण असेच भेटणार,
म्हणून नको होऊ उदास
नववर्षातही हा संधीप्रकाश
असाच अविरत पसरणार…
असाच अविरत पसरणार..!!

संध्या मनोज पाटील
अंकलेश्वर,गुजरात
==========

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles