न्यू मून इंग्लिश मिडीयम स्कूल व सायन्स ज्युनियर काॅलेज येथे दोन दिवस रंगले स्नेहसंमेलन

न्यू मून इंग्लिश मिडीयम स्कूल व सायन्स ज्युनियर काॅलेज येथे दोन दिवस रंगले स्नेहसंमेलनपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_’सुप्त गुणांचा विकास हेच सर्वांगीण यशोप्रगतीचे महाद्वार’_

प्रा.तारका रूखमोडे, प्रतिनिधी

गोंदिया/ अर्जुनी मोर: विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी स्थानिक न्यु मून इंग्लिश मिडीयम स्कूल व सायन्स ज्युनियर काॅलेज अर्जुनी/ मोर. येथे दोन दिवसीय स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या स्नेहसंमेलन उद्घाटन प्रसंगी उद्घाटक आमदार मनोहर चंद्रिकापुरे होते,कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष यशवंत परशुरामकर तर प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी वरूणकुमार शाहारे, नगराध्यक्षा मंजुषा बारसागडे, पंचायत समितीचे उपसभापती होमराज पुस्तोडे,संस्थासचिव ओमप्रकाश सिंह पवार,संस्थेचे पदाधिकारी भाऊराव पत्रे, गिरीश पालीवाल,राधेश्याम भेंडारकर, संतोष बुकावन,भाग्यश्री पत्रे ,छगन शहारे, नितेश क्षीरसागर, प्राचार्य राकेश उंदीरवाडे, पर्यवेक्षिका तारका रुखमोडे इ. उपस्थित होते.

उद्घाटक, अध्यक्ष व प्रमूख अतिथींच्या हस्ते दीपप्रज्वलन तथा प्रतिमा पूजन करू्न महाराष्ट्र गीताने व स्वागतगीताने रीतसर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. आमदार चंद्रिकापुरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांच्या साहित्यप्रतिभारुपी ‘रायझिंग स्टार’ या हस्तलिखिताचे विमोचन करण्यात आले. दहावी, बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी राहुल शिंदे व वेदांत देशमुख यांचा यावेळी सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तारका रुखमोडे यांनी आपल्या प्रास्ताविकातून स्नेहसंमेलन घेण्यामागचा संस्थेचा हेतू तथा मानस व विद्यार्थ्यांच्या वर्षभरातील प्रगतीच्या लेखाजोख्याचा आढावा घेतला. व संस्थेचे विद्यार्थ्यांच्या विकासासाठी पुढील ध्येय काय आहेत यावरही प्रकाश टाकला.

जे विद्यार्थी क्रीडाक्षेत्रात विविध स्पर्धेत तालुकास्तरावर,जिल्हास्तरावर,विभागीय स्तरावर अव्वल आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा, व बहुउद्देशीय शिक्षण संस्था नागपूर तर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत नामांकन मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान व पहिल्या दिवशी विविध प्रदर्शनीत भाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

स्वत:तील सुप्त प्रतिभेला उजागर करण्यासाठी व शालेय जीवनात स्नेहसंमेलने ही माध्यमे असतात. यासाठी विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनाच्या प्रत्येक उपक्रमात भाग घेऊन यश संपादन केले पाहिजे .शालेय जीवनातच मनावर शिक्षणाच्या माध्यमातून व कृतीतून संस्कार घडतात.आत्मोन्नतीसाठी संस्कार हे महत्त्वाचे असतात.जे या शाळेत तुमच्या मनावर बिंबवले जात आहेत त्याचं सोनं करा .महापुरुषांचे चरित्राचे वाचन करा.असे उद्घाटकीय भाषणातून आमदार चंद्रिकापुरे म्हणाले.

शिक्षण घेत असताना परिस्थितीवर मात करुन जिद्दीने अभ्यासाला कृतीची जोड देऊन यश संपादन करा. डाॅ.बाबासाहेबांच्या यशाचं फलित म्हणजे त्यांचा गहन अभ्यास, वैचारिक कृतीची व मनोबलाची जोड हेच आहे, तेव्हा आपली बलस्थाने ओळखून त्यावर मार्गक्रमण करा.असे अध्यक्षीय भाषणातून यशवंत परशुरामकर यांनी मार्गदर्शन केले.

क्रीडा, सांस्कृतिक व विविध कलागुण प्रदर्शित करण्याची संधी स्नेह संमेलनाच्या माध्यमातून उपलब्ध होते. यातूनच व्यक्तिमत्व विकसास चालना मिळते. गुरुजनांनी सांगितलेल्या योग्य मार्गावर चाला आयुष्य घडवण्याचे हेच वय आहे, वेळेचा सदुपयोग करा असे प्रतिपादन व स्पर्धा परीक्षेविषयी मार्गदर्शन उपविभागीय अधिकारी वरूणकुमार शाहारे यांनी केले. सचिव ओमप्रकाशसिंह पवार यांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी कायमच संस्था पाठीशी असेल या ग्वाहीसह विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्यात.

सांस्कृतिक कार्यक्रम संपल्यानंतर बक्षिस वितरण कार्यक्रमात अध्यक्षस्थानी गिरीश पालीवाल तर अतिथी म्हणून गोंदिया जि.प चे उपाध्यक्ष यशवंत गणवीर, सुनीता पवार, राधिका भेंडारकर उपस्थित होते. संचालन त्रिवेणी थेर व निकिता बन्सोड यांनी केले.प्राचार्य राकेश उंदीरवाडे यांनी समारोपीय भाषण तथा उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सूरज मोटघरे,लीना चचाणे,आरती मुंगूलमारे ,प्रतीक्षा राऊत, देविदास बांडे, हिना लांजेवार,कुंजना बडवाईक, एस.गायकवाड, कैलाश दिघोरे,प्रवीण नागपुरे, व्ही मेश्राम, शिला बोरीकर, दिनेश बागडे, धानू परिहार, विना लांजेवार, दिपाली मेश्राम यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles