टिक टिक वाजणार की कमळ फुलणार ? विद्यमान खासदारांची विकेट पडणार ?

टिक टिक वाजणार की कमळ फुलणार ? विद्यमान खासदारांची विकेट पडणार ?पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_नागपूर जिल्ह्यात राजकीय चर्चेला उधाण_

_भाजप खासदार असलेल्या जागांवर अजित पवार गटाचा दावा_

बिनधास्त न्यूज वृत्तसेवा, नागपूर

नागपूर : आगामी सन २०२४ लोकसभा निवडणुकीसाठी भंडारा गोंदिया मतदारसंघात महायुतीसह महाविकास आघाडीतील सर्वपक्षीयांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या मतदारसंघामध्ये सन २००९ पासून भाजप- राष्ट्रवादीत मुख्यत: लढत झाली आहे. मात्र, राज्यातील सत्तांतरानंतर महायुतीत अजीत पवारांच्या राष्ट्रवादीने ए्ंट्री केली.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील ९ जागांपैकी विदभार्तील तीन जागांसाठी अजित पवार गट आग्रही असल्याची माहिती समोर आली आहे. इतकेच नाही तर या मतदारसंघातील संभाव्य उमेदवारांची यादीही समोर आली आहे. यामध्ये विदभार्तील भंडारा-गोंदिया, गडचिरोली व वर्धा लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात घड्याळाची टिक टिक वाजणार की भाजपाचे कमळ फुलणार? यावरून जिल्ह्यातील नेतेमंडळींसह नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.

राष्ट्रवादीकडे आधी असलेल्या चार जागा तसेच त्या जागांव्यतिरिक्त आणखी पाच जागांची मागणी अजित पवार गटाने केली आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे चार जागा आहेत यामध्ये बारामती, सातारा, रायगड, शिरूर या चार लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त अजित पवार गटाच्या वतीने धाराशिव, परभणी, दक्षिण मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि भंडारा गोंदिया या पाच लोकसभा मतदारसंघाची मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
तर दुसरीकडे भाजपाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. याप्रकरणी भाजपाने महाराष्ट्रात ‘मिशन- ४५’ डोळ्यापुढे ठेवले आहे. त्यानुसार त्यांनी मोचेर्बांधणीही सुरू केली आहे. भाजपाने महायुतीतील आपल्या मित्रपक्षांपुढे एक फॉम्युर्ला ठेवला आहे. त्यात अनेक विद्यमान खासदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता असल्यामुळे महायुतीत लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून मोठे महाभारत घडण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली आहे. महाराष्ट्रात काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गट व शिवसेनेच्या ठाकरे गटाने यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यानंतर आता भाजपाही कंबर कसून मैदानात उतरला आहे. राज्यात भाजप, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांचे महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे महायुतीपुढे एकजूटपणे ही निवडणूक लढवण्याचे मोठे आव्हान आहे. भाजपाने महायुतीच्या घटक पक्षांचे सर्वच उमेदवार निवडून आणण्याची रणनीती आखली आहे. मात्र, इलेक्टिव्ह मेरीटच्या निकषात मर्यादित कार्यकर्त्यांच्या गोतावळ्यात साहेब म्हणून नावारुपास आलेल्या भंडारा – गोंदियाचे विद्यमान खासदार कमी पडत असल्याची चर्चा भाजपाच्या गोटात आहे. पाच वर्षाच्या कार्यकाळात केवळ विकास कामांच्या वाटपात टक्केवारीचा खेळ करत व्यस्त राहिलेल्या व शेवटच्या टप्प्यात समारंभ उत्सवात रमणाण झाल्यामुळे जिल्ह्यातील हे अनोखे ‘साहेब’ विरोधी पक्षासह स्व-पक्षातील कार्यकर्त्यांना पचनी पडले नसल्याची खमंग चर्चा शिस्तबध्द पक्षाचे आजी माजी पदाधिकारी करीत आहेत. त्यामुळे आपसूकच भाजपाच्या कोट्यातील ही जागा मोदींना पुन्हा पंतप्रधान पदावर आसनस्थ करण्यासाठी इलेक्टिव्ह मेरीटच्या आधारावर राष्ट्रवादीसाठी सोडली जाण्याची शक्यता राजकिय अभ्यासकांकडून वर्तविली जात आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यात भाजपाच्या ‘शेरु -बंड्या’च्या गटातटाच्या श्रेयवादी ‘राज’कारणामुळे आगामी लोकसभा निवडणूकीत साहेब म्हणून परिचीत असलेल्या विद्यमान खासदारांची विकेट पडणार हे निश्चित मानले जात आहे.

_राष्ट्रवादीचा विदर्भातील १० पैकी ३ जागेवर दावा_

राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून विदर्भातील १० पैकी ३ जागेवर दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे भंडारा-गोंदिया, गडचिरोली तसेच वर्धा जिल्हा या तिन्ही जागेवर भाजपचे खासदार आहेत. यात भाजपचे विद्यामान खासदार असलेल्या अशोक नेते यांचा जागेवर देखील अजित पवार गटाचे विद्यमान मंत्री धर्मराव बाबा यांनी स्वत: इच्छुक असल्याच सांगतीले आहे. तसेच बरोबर भंडारा-गोंदिया या ठिकाणी भाजपचे सुनील मेंढे विद्यमान खासदार आहेत, पण याठिकाणी सुद्धा दावा करण्यात आला असून प्रफुल पटेल यांच्यासाठी ही जागा मागण्याची अजित पवार गटाची तयारी आहे. तसेच वर्ध्यात भाजपचे विद्यमान खासदार रामदास तडस आहेत. असे असताना देखील या ठिकाणी या जागेची देखील अजित पवार गटाकडून मागणी केली जात आहे. त्याठिकाणी माजी केंद्रीय मंत्री राहिलेले सुबोध मोहिते हे स्वत: तयारी करत असून वर्धा लोकसभा मतदार संघातील अनेक लोकांचा ते संपर्कात आहेत. त्यामुळे आता या तीन जागांवर काय निर्णय घेतला जातो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

_भंडारा-गोंदियासाठी श्रेष्ठींकडून विचारमंथन_

पाच राज्यांतील विधानसभा निवडणूकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर २०२४ मधील लोकसभा निवडणुकीची तयारी भाजपा अंतिम टप्प्यात आली आहे. भाजपा पक्षश्रेष्ठींनी खासदारांचे काम, लोकप्रियता, संघाशी असलेले नाते, संघाकडून नावाबद्दल मिळणारा ‘ग्रीन सिग्नल’, सोशल माध्यमांवरील सक्रियता, निवडणूक लढविण्याची सर्वंकष क्षमता, स्थानिक पातळीवरील प्राबल्य, स्थानिक नेत्यांकडून मिळणारा पाठिंबा किंवा विरोध आदी बाबींचा आधीच कानोसा घेतला आहे. विदर्भातील अन्य लोकसभा मतदारसंघाप्रमाणेच भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघांबाबातचे सर्वेक्षण अहवाल आधीच पक्षश्रेष्ठींपर्यंत गेले असून भंडारा-गोंदिया मतदारसंघांबाबत अद्यापही विचारमंथन सुरू असल्याची माहिती आहे.

_काँग्रेसकडून दावा केला जाण्याची चर्चा_

बदललेल्या राजकीय परिस्थितीत भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसकडूनही दावा केला जाऊ शकतो अशी चर्चा कार्यकत्यांमध्ये ऐकावयास मिळते. काही महिन्यांपूर्वी काँग्रेसचे नेते व राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाºयांची बैठक झाली. या बैठकीत भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रात आगामी निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार देण्याची मागणी केली गेली. काँग्रेस कार्यकत्यांचे म्हणणे जाणून घेत त्याबाबतचा अहवाल पक्षश्रेष्ठींना सादर करण्यात आला आहे. त्यामुळेच भविष्यात निवडणुकीपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीचे नेते काय निर्णय घेणार? याकडे कार्यकत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles