आजचे दिनविशेष दि.११ जानेवारी २०२४ वार : गुरुवार

 1. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
  *📚आजचे दिनविशेष📚*
  ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
  *दि.११ जानेवारी २०२४ वार : गुरुवार*
  ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
  *महत्वाच्या घटना*१७८७: विल्यम हर्षेल यांनी टिटानिया आणि ओबेरॉन या युरेनसच्या चंद्राचा शोध लावला.  पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

  १९२२: मधुमेहावर उपचार करण्यासाठी प्रथमच इन्सुलिनचा वापर करण्यात आला.

  १९४२: दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी कुआलालंपूर जिंकले.

  १९६६: गुलजारीलाल नंदा यांनी भारताचे हंगामी पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला.

  १९७२: पूर्व पाकिस्तानचे बांगला देश असे नामकरण करण्यात आले.

  १९८०: बुद्धिबळाच्या खेळात नायजेल शॉर्ट वयाच्या १४ व्या वर्षी जगातील सर्वात लहान ईंटरनॅशनल मास्टर झाला.

  १९९९: कमाल जमीनधारणा कायदा रद्द करणारा वटहुकूम केंद्र सरकारकडून जारी.

  २०००: छत्तीसगड उच्‍च न्यायालयाची स्थापना.

  २००१: एस. पी. भरुचा यांनी भारताचे ३० वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

  *जन्म / जयंती*

  १८१५: कॅनडाचे पहिले पंतप्रधान जॉन ए. मॅकडोनाल्ड यांचा जन्म. (मृत्यू: ६ जून १८९१)

  १८५८: हिंदी साहित्यिक श्रीधर पाठक यांचा जन्म. (मृत्यू: १३ सप्टेंबर १९२६)

  १८५९: ब्रिटिश मुत्सद्दी आणि भारताचा व्हॉइसराय लॉर्ड कर्झन याचा जन्म. (मृत्यू: २० मार्च १९२५)

  १८९८: ज्ञानपीठ विजेते साहित्यिक वि. स. खांडेकर यांचा जन्म.

  १९४४: झारखंडचे ७ वे मुख्यमंत्री आणि खासदार शिबू सोरेन यांचा जन्म.

  १९५५: उपशास्त्रीय व नाट्यसंगीत गायिका आशा खाडिलकर यांचा जन्म.

  १९७३: क्रिकेटपटू खेळाडू द. ग्रेट इंडियन वॉल राहुल द्रविड यांचा जन्म.

  *मृत्यू / पुण्यतिथी*

  १९२८: इंग्रजी कादंबरीकार थॉमस हार्डी यांचे निधन. (जन्म: २ जून १८४०)

  १९५४: सायमन कमिशन या आयोगाचे अध्यक्ष सर जॉन सायमन यांचे निधन. (जन्म: २८ फेब्रुवारी १८७३)

  १९६६: भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांचे निधन. (जन्म: २ ऑक्टोबर १९०४)

  १९९७: अर्थतज्ञ भबतोष दत्ता यांचे निधन. (जन्म: २१ फेब्रुवारी १९११)

  २००८: मराठी लेखक यशवंत दिनकर तथा य. दि. फडके यांचे निधन. (जन्म: ३ जानेवारी १९३१

  २००८: माउंट एव्हरेस्टवर सर्वप्रथम चढाई करणारे न्यूझीलंडचे गिर्यारोहक सर एडमंड हिलरी यांचे निधन. (जन्म: २० जुलै १९१९)
  ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
  *मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*🚩
  ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
  *🙏संकलन/मुख्य सहप्रशासक🙏*
  *✍श्री अशोक लांडगे*
  95273 98365
  *©मराठीचे शिलेदार समूह*
  ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles