केळकरांनी चिकाटीने उभे केले संग्रहालय”; श्याम भुर्के

केळकरांनी चिकाटीने उभे केले संग्रहालय”; श्याम भुर्के



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_दिनकर केळकर जयंती उत्साहात साजरी_

अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी

पुणे: पुणे शहरातील प्रसिध्द राजा दिनकर केळकर संग्रहालयाचे संस्थापक पद्मश्री डॉ दिनकर केळकर, यांची १२८ वी जयंती अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या वतीने समारंभ पूर्वक साजरी करण्यात आली. साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य श्याम भुर्के यांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले,”दिनकर केळकर यांनी एकट्याच्या बळावर चिकाटीने आणि कुशल व्यवहारज्ञान व संग्राहक वृत्ती या गुणामुळे सुमारे २१ हजाराच्यावर दुर्मिळ वस्तू जमवून हे संग्रहालय ऊभे केले आहे.

आज पुण्यातील सर्वात प्रेक्षणीय स्थळ म्हणून ते गणले जाते. या संग्रहालयाला भेट देण्यासाठी दूरदूरून लोक येतात. शाळा,काॅलेज विद्यार्थ्यांसाठी हे संग्रहालय म्हणजे चालता बोलता ईतिहास आहे. पुण्याचा ईतिहास आणि संस्कृतिचे प्रतिबिंब असलेले हे संग्रहालय म्हणजे पुण्याचे भूषण आहे” अशा शब्दात त्यांनी डॉ केळकर यांच्या कार्याचा गौरव केला.

कार्यक्रमाच्या आरंभी स्व. केळकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमास डॉ. श्रीकांत केळकर, अरुणा व संजय केळकर, सुधान्वा रानडे, गीता भुर्के, तसेच संग्रहालय प्रेमी व सर्व संग्रहालय परिवाराची उपस्थिती होती.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles