“अस्ताव्यस्त ते शिस्तबद्ध एक जीवनप्रवास मानवाचा”; वैशाली अंड्रस्कर

➖➖➖➖✍️📘✍️➖➖➖➖
*शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धा*पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

➿➿➿➿📚🖋️📚➿➿➿➿

*✍️परीक्षणाच्या निमित्ताने…*

➿➿➿➿📚🖋️📚➿➿➿➿

*अस्ताव्यस्त ते शिस्तबद्ध एक जीवनप्रवास मानवाचा….!*

*अरे अरे किती हा पसारा….तुला नं शिस्तच नाही अजिबात…सारं घर अस्ताव्यस्त करून ठेवलंय…कोण आवरणार आता हे सगळं…? अगदी काही वर्षांपूर्वीचा आई आणि मुलांमधील हा संवाद जवळजवळ नाहिसा होतोयं…!*

*आधुनिक तंत्रज्ञान, कोरोना काळातील त्याची शाळा-कॉलेजपातळीवर निकड, हरवलेली मैदाने, यात मुले आपल्याच विश्वात रमू लागली. मोबाईल मधील गेम, आकर्षक व्हिडिओ या एकटेपणाकडे नेणाऱ्या साधनांमुळे लहान मुलांचा घरातील दंगामस्तीचा आणि मोठ्या माणसांचा त्यांच्याशी कधी प्रेमळ तर कधी कठोर होणारा संवादच हरपला.पालकांच्या संवादातून मिळणारे अस्ताव्यस्त पासून शिस्तबद्धतेकडे नेणारे अनौपचारिक धडे आता संस्कार वर्गात शुल्क भरून घ्यावे लागते हेच या पिढीचे दुर्दैव…!*

*कदाचित त्यामुळेच मनाने दूर गेलेली नाती आज पावलोपावली दिसतेयं. भौतिक आणि भावनिक या दोन्ही स्तरावर आज आपण विस्कटलेपण बघतोयं. अस्ताव्यस्तपणा बघतोयं. पण त्याचं मूळ आपल्याच लालसेच्या उगमातून झालेलं आहे. निसर्ग, पर्यावरणाचा -हास त्यापायी अस्ताव्यस्त झालेले निसर्ग चक्र, मग अस्मानी सुलतानी संकटांना झेलत आयुष्य कंठणं…*

*स्वार्थ, अहंभाव, स्त्री-पुरुष नात्यांतील दरी मानवी जीवनाला जणू शाप. या शापामुळे कितीतरी कुटुंबे विस्कटतात, मैत्रीची नाती अस्ताव्यस्त होतात. थांबायला हवे हे कुठेतरी… आज मराठीचे शिलेदार समूहात शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेच्या निमित्ताने ‘अस्ताव्यस्त’ हा विषय माननीय मुख्य प्रशासक राहुल पाटील यांनी दिला आणि शिलेदारांच्या वैविध्यपूर्ण लेखणीचे दर्शन झाले. समाज, राजकारण, श्रीमंत-गरीब दरी, नात्यांतील रूसवे फुगवे, निसर्गाचा प्रकोप, विकृत मनाची दाहकता, सहचराच्या विरहाने अस्ताव्यस्त झालेले जीवन… अशा एक ना अनेक आशयसंपन्न रचनांनी समूह समृद्ध झाला…सर्व सारस्वतांचे खूप खूप अभिनंदन आणि भावी वाटचालीस भरभरून शुभेच्छा…!*

➖➖➖➖✍️📘✍️➖➖➖➖
*✍️सौ.वैशाली उत्तम अंड्रस्कर, चंद्रपूर*
*कवयित्री/लेखिका*
*©सहप्रशासक/मुख्य परीक्षक/संकलक*
*©मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔖🌸🔖♾️♾️♾️♾️

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles