लेक

लेक



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

लेक असते मायेची पाखर
जीभेवर सदा गोड साखर

तिच्या असण्याने फुलते
कसे घरात नंदनवन
तिच्यातच सामावते
मायबापाचे अवघे जीवन

लावते लळा मायबापा
जणू प्रेमाचा सागर
लेक असते मायेची पाखर..१

तिच्यामुळेच येते अवघ्या
घराला खरे घरपण
केवढे निर्मिले दैवे
तिच्या हृदयी चांगुलपण

आटणार नाही कधीही
तिची दयेची विहीर
लेक असते मायेची पाखर..२

ती शोभते घराला या
जशी दारी तुळशीवृंदावन
ती भासते घराला
जणू हिऱ्यांचे कोंदण

नसतेच तिच्या अंतरंगात
गुणांची थोडीही कसर
लेक असते मायेची पाखर..३

तिच्या पायगुणाने होतो
झोपडीचाही राजमहल
तिच्या असण्याने लाभते
मायबापा सुखाची चाहूल

घरचा स्वर्ग होतो लागता
दोन्ही तिचे कर
लेक असते मायेची पाखर..४

ती जाणार परक्या घरी
ही जगाची न्यारी रीत
दुःख होते मायबापा
त्या क्षणी अपरिमित

तरी नसते तिची कधीच किरकिर
लेक असते मायेची पाखर..५

पाठवणीची घटिका येते
अश्रू मायेच्या डोळ्यांत
कन्यादान करताना बाप
न्हातो उभा आसवांत

विधात्या कशी रे जनरीत ही
जेव्हा साजतो लेकीचा पदर
लेक असते मायेची पाखर…६

श्री.पांडुरंग एकनाथ घोलप
ता.कर्जत जि.रायगड
========

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles