अस्ताव्यस्त

अस्ताव्यस्त



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अर्धमेल्या स्थितीत
तो रस्त्यावर आहे
उध्वस्त झाले जीवन
तरी तो जगत आहे

स्वप्नील एक परी
जी वाटेवर मिळाली
ध्यानीमनी नसताना
जीवनात त्याच्या आली

लाभली साथ तिची
ते आयुष्य स्वर्ग वाटले
अचानक गेली निघून
नयनी अश्रूधारा दाटले

हसता खेळता सुखी
जो संसार मोडून पडला
तिच्या गेल्यामुळे तो
घरातून रस्त्यावर आला

त्या तुफानी वादळात
विखुरले सुखी संसार
नाही जमले त्याला ती
अस्ताव्यस्त आवराआवर

ढगामधून सूर्य जसा
निरभ्र आसमंती यावा
अन् त्याच्या आगीत
सारा संसार भस्म व्हावा

चंदू डोंगरवार अर्जुनी मोर
==========

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles