जे.एस.एम.कॅम्पसमध्ये सायबर सिक्युरिटी विषयावर सेमिनारचे आयोजन

जे.एस.एम.कॅम्पसमध्ये सायबर सिक्युरिटी विषयावर सेमिनारचे आयोजनपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी

अलिबाग: शहरात आज मंगळवार,दि.१६ऑक्टोबर २०२४ रोजी जनता शिक्षण मंडळाचे ॲड. दत्ता पाटील विधी महाविद्यालय आणि जे .एस.एम.महाविद्यालय अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड पोलीस आणि एम.के.सी.एल.यांच्यामार्फत सायबर सुरक्षा जनजागृती अभियानाच्या समारोप समारंभाचे औचित्य साधत सायबर सिक्युरिटी या विषयावरील सेमिनारचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा.श्री.सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, जिल्हा रायगड यांनी भूषविले.मा.श्री.संजय बांगर पोलीस निरीक्षक, अलिबाग या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.मा.श्री.तुषार निकम(रिजनल मॅनेजर एम.के.सी.एल.),मा.श्री.
जयंत भगत (कोकण विभाग मेंटर, एम.के.सी.एल.),मा.श्री.मंगेश जाधव (कोकण विभाग समन्वयक एम.के.सी.एल.),मा.श्री.सिध्देश गोसावी(जिल्हा समन्वयक एम.के.सी.एल.) आणि इतर पदाधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते.

मा.श्री.सोमनाथ घार्गे,पोलीस अधिक्षक,जिल्हा रायगड यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनामध्ये भविष्यात सायबर गुन्ह्यांमध्ये होणारी वाढ आणि आव्हाने याबाबत चिंता व्यक्त केली. त्यांनी युव्हाल नोआ हरारी यांच्या “होमो ड्युस” या पुस्तकाचा संदर्भ देत माणूस माणसावरच अधिराज्य गाजवून स्वतःचा नाश ओढवून घेईल अशी भीती व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी मोबाईल फोनचा योग्य वापर करत स्वतःची सुरक्षा स्वतः करत न घाबरता पोलीस स्टेशनकडे तक्रार करण्याचे आवाहन त्यांनी केले.

मा.श्री.मंगेश जाधव (कोकण विभाग समन्वयक एम.के.सी.एल.) यांनी सायबर गुन्हे आणि सायबर सुरक्षा यावर प्रास्ताविक सादर केले. मा.श्री.सिध्देश गोसावी(जिल्हा समन्वयक एम.के.सी.एल.) यांनी सायबर गुन्हे आणि सुरक्षा या विषयावर पॅावर पॅाईन्ट प्रेझेंटेशन केले.त्यांनी विविध प्रकारच्या सायबर गुन्ह्यांचे स्वरुप आणि प्रकारांचे उदाहरणासहित विश्लेषण केले. डार्क वेब हॅकिंग, फिशिंग, डीप फेक या सायबर गुन्ह्यांविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली.नागरिकांनी मोबाईलचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले.

जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा.ॲड गौतमभाई पाटील, उपाध्यक्ष डॅा.साक्षी पाटील, जे. एस. एम. महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य मा.डॅा. सोनाली पाटील,विधी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य मा.ॲड.नीलम हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला विभाग कक्ष आणि अंतर्गंत तक्रार तसेच आय.क्यु.ए.सी. समितीमार्फत प्रा.गौरी लोणकर,प्रा.निलम म्हात्रे,प्रा.समिक्षा म्हात्रे यांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले.

विधी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य.मा.ॲड.नीलम हजारे, आय.क्यु.ए.सी. समन्वयक डॅा.संदीप घाडगे, विधी महाविद्यालय आणि जे. एस. एम. महाविद्याविद्यलयाचे महिला विभाग कक्ष सदस्य,प्राध्यापक, विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.विधी महाविद्यालयाच्या प्रा.निलम म्हात्रे यांनी सेमिनारचे सूत्रसंचालन केले आणि जे.एस.एम.महाविद्यालयाच्या महिला विभाग कक्ष आणि अंतर्गत तक्रार समिती प्रमुख प्रा.गौरी लोणकर यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles