“प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेली मासेमारी”; विष्णू संकपाळ

प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेली मासेमारी”; विष्णू संकपाळपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_गुरूवारीय चित्र चारोळी’ स्पर्धेचे परीक्षण_

“वल्हव रे नाखवा हो वल्हव रे रामा
मी डोलकर डोलकर, डोलकर दर्याचा राजा
घर पाण्यावरी, बंदरात करतोय ये जा$$$$

ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांचे हे शब्द, लता दिदी आणि हेमंतकुमार यांनी अजरामर केले. ‘मासेमारी’ हा प्रमुख व्यवसाय असलेल्या कोळी समाजाचे यथार्थ वर्णन या गीतात खूबीने केले आहे. सर्वसाधारणपणे मान्सून भरात आल्यानंतर सागरी मासेमारी बंद होते आणि पुढे नारळी पौर्णिमेपासून समस्त कोळी बांधव सागराची पूजा बांधून मच्छिमारीसाठी खोल समुद्रात उतरतात. समुद्री वादळवारे अंगावर घेत जीवावर उदार होऊन ही जमात याच उद्योगावर आपले घरसंसार चालवते. कधी कधी दुर्दैवाने धोक्याचा अंदाज न आल्याने किंवा अचानक उफाळणार्‍या वादळामुळे मच्छिमारांना जीव गमवावा लागतो.

खारे पाणी आणि गोड्या पाण्यातील मच्छीमारी वेगवेगळ्या स्वरूपात विकसित झालेली असून आजकाल मत्स्यपालन हा एक अलिकडच्या काळात अर्थार्जनासाठी उभारलेला व्यवसाय चांगलाच बाळसे धरू लागला आहे. नद्या, तलावाच्या माध्यमातून मासेमारी करून उपजिविका करणारे अनेक लोक आजही मोठ्या प्रमाणात आहेत. शहरी भागात आसपासच्या नदी, तलावाकाठी काठीला गळ बांधून सुटाबुटात वावरणारे काही हौसे गवसे मासेमारीचा आनंद घेत असतात. हा गमतीचा भाग वगळल्यास मासेमारीचे अर्थकारण खूप आश्चर्यकारक आहे.

“पाण्यामध्ये मासा झोप घेई कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे” अशी एक म्हण आहे. जगात एकवीस हजार जातीचे मासे आढळतात आणि मासा हा सर्वात बुद्धिमान प्राणी असल्याचे बोलले जाते. मात्र हाच मासा कोळ्यांच्या जाळ्यात अडकतो आणि आपल्या ताटात येतो व निवांत झोप घेतो. आज दुर्दैवाने, वाढत्या औद्योगिकरणामुळे रासायनिक सांडपाणी व विषारी द्रव्ये नदीमार्गाने समुद्रात मिसळून असंख्य जलचर नामशेष होत आहेत. जननक्षमता प्रचंड आणि अन्नसाखळीतला महत्वपूर्ण घटक असलेली माशांची जात सुद्धा याच प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. अशा या माशांचे विश्व प्रचंड अचंबित करणारे आहे तो वेगळा विषय.

‘गुरूवारीय चित्र चारोळी’ स्पर्धेसाठी समूह प्रमुख आदरणीय राहुल दादांनी ‘मासेमारी’ हा विषय देऊन अचूक समयसूचकता साधली. समस्त शिलेदारांनी सुद्धा छान लेखन केले. जाता जाता इतकेच सांगू इच्छितो की, ‘काव्यप्रकार कोणताही असो त्यामध्ये कमालीची मार्मिकता आणि आशयसंपन्नता, दूरदृष्टीपणा व संवेदनशीलता जाणवायला हवी.’ सर्वाना खूप खूप शुभेच्छा. आज मला परिक्षण लिहायची संधी मिळाली याबद्दल आ. दादांचा मी आभारी आहे.

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य, सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles