मी आणि किचन

मी आणि किचनपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

मी आणि किचन
नाते आमचे अनामिक
किचनमध्ये गेल्याशिवाय
राहवत नाही क्षणिक ||१||

सुप्रभाती पाऊल माझे
वळते किचनच्या दिशेला
मनाला नवी उभारी येते
पंख फुटती आशेला ||२||

काय करावे आज बरे
चहासोबत नाष्टयाला
खांदे उडवित हात शोधतो
पोह्यांनी भरलेल्या बरणीला ||३||

चहा झाला नाष्टा झाला
जेवणाच्या डब्याचे काय?
विचारांच्या गर्दीमध्ये सापडतो
एक अखेरचा उपाय ||४||

पीठ,मीठ,पाणी यांची
यांची पडते गाठ
कणिक मळून झाली आता
भाजीचा तो घाट ||५||

फ्रीज उघडताच नजरेसमोर
दिसतो भाज्यांचा तो थाट
मेथीला घेता अलगद क्षणात
रुसून बसला तो माठ ||६||

पांडुरंग एकनाथ घोलप
कर्जत,जि.रायगड

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles