स्वराज्याचा छावा

स्वराज्याचा छावा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

स्वराज्याचा छावा होता तो
सिंहगर्जनानी प्राणपणाने लढला
पित्याप्रमाणे देशभक्तीत मुरला
नाही तो कुणालाच घाबरला

पुरंदर किल्ल्यात जन्म संभाजी राजे
माता सईबाई च्या संस्कारीत उदरी
तेजोमय हिरा महाराष्ट्र देशा जन्मला
संभाजी राजा शिवाजीरायाच्या पदरी

स्वराज्य रक्षक स्वराज्य धारक
धाडसी ,झुंजार, शौर्यतीचा भावा
पराक्रमी स्वराज्याचा ध्यास
जिजाऊ प्रेरणा छत्रपती छावा

अनेक भाषेमध्ये पारंगत असणारे
साहित्याचे ज्ञान अवगत राजा
स्वराज्याचा विकास हाच ध्यास
असा हा स्वाभिमानी राजा

गनिमी कावा बाल वयातच रुजलेला
पिताप्रमाणेच तरबेज होता
शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिला
असा हा वीर पराक्रमी राजा होता

फोडूनी वाचा मोजले सिंहाचे दात
पुरंदरचागड दिव्याने चमकला
शंभूराजे प्राणमुक्ती निधड्या छातीत
मानाचा मुजरा शिवाजीच्या छाव्याला

कुसुम पाटील,कसबा बावडा

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles