ठरलं तर मग ?

ठरलं तर मग ?



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

ठरलं तर मग ?
अशा खोट्या आश्वासनांची
सवय झालीय मला…
तुच दिलेली वचनं कधी
पाळता नाही जमले तुला…
कधी म्हणतोस मला
तूच माझं जीवन ..
पण वेळ नाही तुला
जाणून घेण्यास माझं मन…
कधी म्हणतोस तुला
सोन्याने मढवेन…
पण असेही म्हण कधी
आज प्रेमरंग चढवेन…
तुझ्या सहवासाला अजून
किती मी तरसणार…
कधी तो पूर्वीसारखा
प्रेमाचा पाऊस बरसणार…
कमाविण्याच्या नादात तू
कित्येक क्षण गमाविले…
तुझ्या यशातच सदैव
मी ही स्वतःस रमविले…
नेहमीचंच तुझं माझ्यावर
दया दाखविण…
ठरलं तर मग ? म्हणत
ती वेळ निभावीण…
एकही ठरवलेली घटना
तुला आठवत नाही…
मी मात्र रडगाणं तेच गात राही…
नको आता मलाही तुझा तो बहाणा…
भावनांना दिलाय मी ही सल्ला शहाणा…
कोण म्हणतं एकटेपणात
आनंद मिळत नाही…
तोच तर क्षण असतो जिथे
परमात्मा साथ देई…
ठरलं तर मग? माझेही
जीवन व्यर्थ घालविणार नाही..
आत्मसुखाच्या वाटेवरती
एकटी चालत राहीन..!!

संध्या मनोज पाटील
अंकलेश्वर, गुजरात

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles