“सारीपाट: खेळ सुखदुःखाचा”; वृंदा करमरकर

“सारीपाट: खेळ सुखदुःखाचा”; वृंदा करमरकरपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_सोमवारीय त्रिवेणी काव्यस्पर्धेचे परीक्षण_

‘सारीपाट’ हा खेळ ऐतिहासिक काळापासून प्रचलित आहे. शंकर पार्वती हा खेळ खेळत असत. हा एक द्यूताचाच प्रकार आहे. या खेळात जसं दान पडेल तसा तो खेळावा लागतो. जीवन हा एक सारीपाटच आहे,असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. जीवनाचा सारीपाट या खेळात दान नियती टाकत असते आणि खेळ माणसाला खेळायचा असतो. मध्यंतरी मी मुलाकडे पुण्याला गेले होते. सकाळी दारावरची बेल वाजली आणि पारू आली कामाला. तोच हसरा चेहरा, बोलके डोळे. तिच्या वाट्याला पुरेपूर दुःख आलं. लग्नानंतर दोन वर्षात नवरा साप चावून गेला. सासरच्यांनी घराबाहेर काढलं. मुलाला घेऊन बाहेर पडली. मोलमजुरी करून मुलाला शिकवलं, मोठं केलं, लग्न लावलं त्याचं. पाचसहा महिन्यात सुनेचं ऐकून पारुला घराबाहेर काढली. पारुनं डोळ्यांतील पाणी निकरानं पुसलं. जिद्दीनं उभी राहिली. दुसऱ्यांची धुणीभांडी करुन हक्का ची झोपडी बांधली. तिच्या चेहऱ्यावरचं हास्य कधी मावळलं नाही. ती म्हणते,”नशिबानं माजी मस्करी केली, पर म्या धडधाकट हायी. कष्टाला मी ताठ आहे आनी उगाच म्या रडत कशाला बसू”.

“सारिपाट जीवनाचा मांडला
दान पडले तसा डाव खेळला,
तरी फरपटच आली वाट्याला”

अशी फरफट जरी आली वाट्याला तरी, मनावर संयम ठेवून जीवन जगले पाहिजे, हेच पारुच्या उदाहरणावरून लक्षात येईल. सारीपाटाच्या खेळात दान जसं पडेल तसा खेळ खेळावा लागतो. काहीजणांना मनासारखं दान पडतं, तर काहींना उलट दान पडतं पारुसारखं. पण खेळ कसाही वाट्याला आला तरी तो तक्रार न करता खेळायचा हारजितीची पर्वा न करता. प्रत्येकाच्या पूर्व कर्मानुसार सारीपाटाच्या खेळात दान पडतं. प्रत्येक दिवस कसा असेल हे आधी समजत नाही. रोजचा दिवस जसा येईल तसा तो आनंदानं जगायचा एवढचं माणसाच्या हातात आहे.

जीवनात जर आपल्या मनात समाधान असेल; तर भाजी भाकरीला सुद्धा पक्वानांची गोडी येते. समाधानानं जीवन जगणा ऱ्या माणसाला सुखाची वाण कधीच पडत नाही.खरेपणानं वागणं, तत्वनिष्ठ राहणं हे गरजेचं आहे. आजच्या त्रिवेणी काव्यस्पर्धेसाठी आदरणीय राहुलसरांनी दिलेला “सारीपाट” विषय समर्पक आहे. शिलेदारांनी थोडा फार प्रतिसाद दिला. पण अजून स्पर्धेला प्रतिसाद मिळावा ही अपेक्षा…!!

वृंदा(चित्रा)करमरकर
मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक
सांगली जिल्हा सांगली
©मराठीचे शिलेदार समूह

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles