अयोध्या श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त गिरवी गोपाळ कृष्ण मंदिरात महापूजा

अयोध्या श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त गिरवी गोपाळ कृष्ण मंदिरात महापूजा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अमृता खाकुर्डीकर, पुणे प्रतिनिधी

पुणे: अयोध्या श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळादिनी फलटण तालुक्यातील “गिरवी” या गावी पवित्र कृष्णस्थान म्हणून प्रसिध्द असलेल्या प्राचीन अशा “गोपाळ कृष्ण मंदिरात” विशेष पूजेचे आयोजन करून आनंद सोहळा साजरा करण्यात आला.

मंदिर व्यवस्थापन आणि ग्रामस्थ यांनी एकत्रितपणे दीपोत्सव, नामजप, रामभजन आणि प्रसाद वाटपाचे आयोजन केले होते. यावेळी प्रसिध्द कीर्तनकार मिलिंद नातू यांचे कीर्तन रामभक्तांसाठी खास आयोजित करण्यात आले होते. अयोध्या श्रीराम मंदिर आणि गिरवी येथील गोपाळ कृष्ण मंदिर यांचा विशेष ऋणानुबंध आहे, असे मंदिराचे विद्यमान उत्तराधिकारी श्री जयंत काका देशपांडे यांनी प्रस्तूत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

भक्ती मार्ग प्रचार व प्रसाराचे कार्य करणा-या या कृष्णमंदिराच्या वतीने भक्तांकडून लिखित नाम जपाचा प्रकल्प देशाच्या विविध प्रांतात राबविण्यात आला होता. त्याला सर्व स्तरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला, आणि तो सर्व नामजप अयोध्येला “राममंदिर भूमी पूजन” प्रसंगी समर्पित करण्यात आला. नामजप साधकांसाठी हा विशेष सन्मानाचा अमृतयोग होता, अशी साधकांची भावना असून आयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माण व भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळ्याबद्दल सर्व उपस्थितांनी भरभरून आनंद व्यक्त केला.

दि.26, 27 व 28 जानेवारी रोजी गिरवी, कृष्ण मंदिरात कृष्ण चरित्र पारायण व महापूजा होणार असून 27तारखेस कृष्ण रुक्मिणी विवाह सोहळा आयोजित केला आहे. या तीन दिवसीय सोहळ्यास भाविकांनी उपस्थित राहावे असे मंदिराच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles