जरांगे पाटलांची सरकारला आज रात्रीची मुदत; उद्या मुंबईकडे कूच करणार

जरांगे पाटलांची सरकारला आज रात्रीची मुदत; उद्या मुंबईकडे कूच करणारपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

मुंबई- मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि सरकारचे शिष्टमंडळ यांच्यामध्ये जवळपास दोन तास चर्चा झाली. बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगण्यात आलं. शिष्टमंडळासोबतच्या भेटीनंतर जरांगे पाटील यांनी वाशीतील शिवाजी चौकात सभा घेतली. यावेळी त्यांनी सरकारचा जीआर समाज बांधवांना वाचून दाखवला. तसेच सरकारने मान्य केलेले मुद्दे समोर मांडले.

*आज रात्री अध्यादेश द्या*

आम्हाला मुंबईत यायची हौस नव्हती. आम्ही काम करणारी माणसं आहोत. पण, सर्व सगेसोयऱ्यांना आरक्षण देण्याचा अध्यादेश अद्याप दिला नाही. आजच्या रात्रीत तुम्ही सगेसोयऱ्यांना आरक्षण देण्याचा अध्यादेश आम्हाला द्यावा. आजची रात्र इथेच काढतो. तोपर्यंत सरकारचे अध्यादेश काढावा. जोपर्यंत पूर्ण आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मागे जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका जरांगेंनी घेतली आहे. त्यामुळे अद्याप तोडगा निघालेला नाही. उद्यापर्यंत मराठा बांधव वाशीमध्येच मुक्काम ठोकतील.

जरांगे पाटील यांनी सरकारला आज रात्रीपर्यंतची मुदत दिली आहे. आज रात्रीपर्यंत त्यांनी सगेसोयरे यांना देखील आरक्षण मिळण्यासाठीचा अध्यादेश काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. अन्यथा उद्या आझाद मैदानाकडे कूच करु कशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे. आरक्षण मिळालं नाही तरी आझाद मैदानात जाणार, तसेच आरक्षण दिलं तरी वियजाचा गुलाल उधळण्यासाठी आझाद मैदानात जाणार, असं ते म्हणाले.

सरकारसोबत चर्चा झाली. त्यांचे मंत्री आले नव्हते. सचिव आले होते. सारासार निर्णय घेऊन ते आपल्यापर्यंत आले होते. नोंदी देण्यासाठी गावागावत शिबिर सुरु करण्यात येणार आहेत. ५४ लाख मराठ्यांना प्रमाणपत्र मिळतीलच. ज्यांच्या नोंदी मिळाल्या त्यांच्या सर्व परिवाराला देखील प्रमाणपत्र देण्यात यावे. अशा २ कोटी मराठ्यांना प्रमाणपत्र मिळू शकते, असं पाटील म्हणाले.

*आतापर्यंत ३७ लाख लोकांना प्रमाणपत्र*

सर्वांना प्रमाणपत्र मिळावे यासाठी समिती नेमल्याचा एक शासन निर्णय मला देण्यात आला आहे. प्रमाणपत्र वाटप सुरु आहे. नोंदी मिळाल्यास अर्ज करण्याची जबाबदारी आपली आहे. त्यामुळे अशा मराठ्यांनी अर्ज करावा. सरकारनं सांगितलंय की ३७ लाख लोकांना प्रमाणपत्र देण्यात आलं आहे. त्याची यादी मला दिली आहे, असं ते म्हणाले.

शिंदे समिती बरखास्त करु नका असं मी सांगितलं आहे. त्यांनी समितीची मुदत दोन महिन्यांनी वाढवली आहे. ज्याच्याकडे प्रमाणपत्र आहे, त्यांच्या सगेसोयऱ्यांना देखील प्रमाणपत्र मिळावं अशी आमची मागणी आहे. नोंद असलेल्या बांधवाने नोंद नसलेल्या बांधवासाठी शपथपत्र द्यायचं. त्यावरुन त्याला प्रमाणपत्र देण्यात यावं, अशी मागणी त्यांनी केली.

*सर्व गुन्हे मागे घ्यावेत*

आंतरवालीसह महाराष्ट्रातील मराठ्यांवरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी केली आहे. यासंदर्भात आम्हाला सरकारकडून पत्र हवं आहे. सुप्रीम कोर्टात जी क्युरेटिव्ह पिटिशन दाखल आहे. तेथून आरक्षण मिळेपर्यंत एखादा मराठा मागे राहत असेल तर तोपर्यंत मराठा समाजाला सर्व शैक्षणिक संस्थामध्ये शिक्षण मोफत करावं. आरक्षण मिळेपर्यंत भरती करण्यात येऊ नये किंवा आमच्या जागा सोडून भरती करण्यात यावी, अशी मागणी जरांगेंनी केली.

राज्यातील मुलींना केजी टू पीजी शिक्षण मोफत देण्याचा आदेश निर्गमित करण्यात आला आहे. पण, मुलांचं काय? कोपर्डीच्या मुद्द्याबाबत आदेश काढल्याचं सरकारनं सांगितलं आहे. आरक्षणाच्या अध्यादेशासाठी आपण इथे आलो आहोत. मराठवाड्यात कमी नोंद सापडल्या आहेत. पण, जशा-जशा नोंदी सापडत आहेत तसे प्रमाणपत्र देण्यात यावेत. सर्व सगेसोगऱ्यांना प्रमाणपत्र मिळेपर्यंत मी आता थांबणार नाही, असं जरांगे म्हणाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles