मराठीचे शिलेदार’ बहुउद्देशीय संस्थेचा ‘मराठी भाषा गौरव दिन’ सोहळा यंदा बुलढाण्यात

मराठीचे शिलेदार’ बहुउद्देशीय संस्थेचा ‘मराठी भाषा गौरव दिन’ सोहळा यंदा बुलढाण्यात



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

दहा कविता संग्रहाचे प्रकाशन, जीवन गौरव, आदर्श शिक्षक व काव्यभूषण पुरस्काराचे होणार वितरण

नागपूर/ बुलढाणा: मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था, नागपूर मागील सात वर्षापासून मराठी भाषा सक्षमीकरणासाठी शैक्षणिक व मराठी साहित्यिक उपक्रमाच्या माध्यमातून अहोरात्र काम करीत आहे. दि २७ फेब्रुवारी २०२४ रोजी वि.वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस ‘जागतिक मराठी भाषा गौरव दिन’ सोहळा दरवर्षी प्रमाणे यंदाही संस्थेच्या वतीने भव्यदिव्य स्वरूपात विदर्भाच्या मातीत, ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या बुलढाणा शहरात साजरा होणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष संस्थापक ‘राहुल पाटील’ यांनी सांगितले आहे.

यावर्षी जागतिक मराठी भाषा गौरव दिन समारंभ मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था नागपूर व यशवंतराव चव्हाण सेंटर, केंद्र बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने दि २७ फेब्रुवारी २०२४ रोजी दोन सत्रात ‘राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्ट इमारत’, ए. आर. डी. सिनेमा हॉलच्या मागे, मलकापूर रोड, बुलढाणा येथे आयोजित करण्यात येणार असल्याचे, आज (दि.२८ रविवार) रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर, बुलढाणा येथे संपन्न झालेल्या नियोजन बैठकीत ठरविण्यात आले. या बैठकीत मराठीचे शिलेदार संस्थेचे अध्यक्ष राहुल पाटील, यशवंतराव चव्हाण सेंटर, केंद्र बुलढाणाचे सचिव नरेश शेळके, आदर्श शिक्षक पुरस्कार निवड समितीचे प्रमुख प्रशांत ठाकरे, सिलवासा, आयोजन समितीचे प्रमुख गजानन भिवसनकर व पत्रकार रंजित राजपूत प्रामुख्याने उपस्थित होते.

नियोजन बैठकीत आवश्यक बाबीवर चर्चा करून शिक्कामोर्तब करण्यात आले. पहिल्या सत्रात मराठीचे शिलेदार प्रकाशन संस्थेतर्फे दहा कविता संग्रहाचे प्रकाशन, मराठी भाषा गौरव दिन विशेषांक २०२४ चे प्रकाशन, तसेच राज्यातील वीस शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. तसेच पाच ज्येष्ठ आदर्श नागरिक, साहित्यिक यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार असून, दुपार सत्रात ७ वे राज्यस्तरीय कवी संमेलन व ६० उत्कृष्ट कवी, कवयित्रींना ‘काव्यभूषण पुरस्कार २०२४’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

बुलढाणा येथे संपन्न होणार असलेल्या या भव्यदिव्य जागतिक मराठी भाषा गौरव दिन समारंभाच्या जय्यत तयारीसाठी आयोजन समिती काम करीत आहे. तरी आदर्श शिक्षक पुरस्कार व काव्यभूषण पुरस्कार व निमंत्रित कवी याबाबत सविस्तर माहिती लवकरच संस्थेच्या वतीने देण्यात येणार असल्याचे अध्यक्ष राहुल पाटील यांनी सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles