प्रेरणादायी स्वप्नझुला’; वृंदा करमरकर

प्रेरणादायी स्वप्नझुला’; वृंदा करमरकरपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

सोमवारीय त्रिवेणी काव्यस्पर्धेचे परीक्षण

किलबिल किलबिल पक्षी बोलती
झुळझुळ झुळझुळ झरे वाहती
फुलपाखरे वर भिरभिरती
स्वप्नी आले काही, एक मी गाव पाहिला बाई

हे गोड बालगीत सर्वांना आठवत असेल. या गीतात लहान मुलांच्या भाव विश्वाचं किती सुंदर वर्णन केलं आहे. आपलं आणि स्वप्नांचं जिव्हाळ्याचं नातं आहे. अगदी कळायला लागल्यापासून आपण स्वप्नाविषयी परिचित आहोत. झोपेत असताना अनुभवास येणाऱ्या प्रति घटना, वस्तू, व्यक्ती, भावन म्हणजेच स्वप्न. स्वप्न अनुभवताना ते स्वप्न पाहणाऱ्याला खरे वाटतं. पण ते खरं नाही हे त्याला झोपेतून जागं झाल्यावर समजतं.”मनी वसे ते स्वप्नी दिसे”अशी म्हण प्रचलित आहे. माणूस जसा विचार करतो तसं स्वप्न त्याला पडतं असं म्हणतात. जागेपणीच्या अनुभवांचं प्रतिबिंब स्वप्नां मध्ये पडत असतं असंही काही जण म्हणतात. काही मानसशास्त्रज्ञ असं म्हणतात कि स्वप्न म्हणजे, अबोध मनाकडं नेणारा राजरस्ता आहे. एकंदरीत स्वप्नं भावभावनांनी गुंफलेली असतात.

निद्रावस्थेत माणसाला पडणाऱ्या स्वप्नांबरोब रच काही स्वप्न माणसानं मनी जपलेली असतात. आपल्याला जीवनात काय करायचे आहे, कोण बनायचे आहे, याचा विचार साधारणपणे माणूस करत असतो.या बाबतीत थोर शास्त्रज्ञ आपले माजी राष्ट्रपती डॉ ए.पी जे.अब्दुल कलाम यांचं एक वाक्य आहे,” जे झोपल्यावर पडते ते स्वप्न नाही तर जे झोपू देत नाही ते खरे स्वप्न”. तरुणपिढीला अशी स्वप्नं पडली पाहिजेत. त्यांना झोपू न देणारी. सतत त्या स्वप्नांच्या पूर्तीचा विचार मनात आला पाहिजे, तो एक ध्यास लागला पाहिजे, त्यादृष्टीनं प्रयत्न केले पाहिजेत आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी हवी. हा ‘स्वप्नझुला’च नेहमी जगण्याची प्रेरणा देईल.

मनाकाशी जिजाऊंच्या झुले
स्वराज्याचा स्वप्नझुला
शिवराये स्वराज्य निर्मिले

राजमाता जिजाऊंनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले. ते स्वप्न त्यांनी बालशिवरायांच्या मनी बिंबवले. त्यातूनच शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली. अनेक क्रांतिकारक देशभक्तांनी देशाच्या स्वातंत्र्याचं स्वप्न मनी जपलं,हा स्वप्नझुला त्यांना वारंवार खुणावत राहिला. त्या ध्यासातून प्रचंड ,त्याग बलिदानातून देशाला स्वातंत्र्य मिळाले.आज आदरणीय राहुल सरांनी दिलेला ‘स्वप्नझुला’ विषय आपल्या जाणिवा विस्तारण्याच्या दृष्टीने उपयुक्त आहे. शिलेदारांनी प्रतिसाद चांगला दिला आहे. पण त्रिवेणी करताना विषयाचा सर्वांगीण विचार व्हावा ही अपेक्षा.

वृंदा(चित्रा)करमरकर
मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक
सांगली जिल्हा सांगली
©मराठीचे शिलेदार समूह

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles