अस्ताव्यस्तः संध्या पाटील

अस्ताव्यस्त



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

तुझ्या खांद्यावर मान टाकून
आज मी निर्धास्त विसावलेय
सूर्यास्त बघताना नकळत मन
त्या कटू गतस्मृतीने उसवलेय …

पार अस्ताव्यस्त झाले होते
“त्या” घटनेने माझे आयुष्य
ऍसिड च्या खुणानी खोलवर
नैराश्यात काळवंडले भविष्य..

वैफल्यात मी हरवले होते
तू जगण्याचे साफल्य केलास
तू प्रेरणास्रोत बनून आलास अन्
मिणमिणत्या पणतीस उजळलास

तू माझ्यासाठी जणू देवदूत
या हृदयमंदिरी सामावलास..
तुझ्या कुशीत मी सुखावलेय
जन्मभराचे नाते निभावलास

माझ्या दिशाहिन आयुष्याला
भक्कम आधाराने सावरलास .
अर्थ दिलास तू ह्या जीवनाला
अस्ताव्यस्त पसारा आवरलास

चांगुलपणा स्वभावात लागतो
जो तुझ्यात मी अनुभवला
विकृत मानसिकतेमुळे मात्र
उगाच बदनाम करतात प्रेमाला…

संध्या मनोज पाटील
अंकलेश्वर, गुजरात
=======

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles