शेवटी ‘माहेरची साडी’ही परकी होते तेव्हा”; सविता पाटील ठाकरे

शेवटी ‘माहेरची साडी’ही परकी होते तेव्हा”; सविता पाटील ठाकरेपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेचे परीक्षण

आयुष्यभर जळणारी ती…., आज खरंच अखेरचं जळत होती, तिच्या सरणावरच्या त्या ज्वाला जणू उंच आकाशाशी स्पर्धा करत होत्या. मी पाहत होती तिच्या त्या सरणाकडे…..!! त्या ज्वालांच्या पलीकडचे ते धूसर दिसणे , त्यात मी तिचा भूतकाळ शोधत होती. घरच्यांच्या विरोधात जाऊन आंतरजातीय लग्न केलं होतं तिने, तेही सुमारे ३५ वर्षांपूर्वी. मनानं तर ती खरंच श्रीमंत होती,खूप प्रयत्न केला तिने तुटलेलं नातं सांधायचा, जोडायचा. परंतु. समोरून आई-बाबा, कुटुंबीयांकडून जो अबोला धरला तो ते आणि ती मरेपर्यंत सुटलाच नाही. इतका अबोला की त्यांच्या अबोल मनानं आज तिची शेवटची ‘माहेरची साडी’ ही परकी केली.

त्यांचं एकच…. तिने आमच्या मनाविरुद्ध केलंय… मनाविरुद्ध??? म्हणजे नेमकं काय हो? आणि कुठे असतं हे मन?? कोणी पाहिले आहे का आजवर?? हिमनगाचा एक दशांश भाग पाण्यावर तरंगतो, तर उर्वरित पाण्याखाली असतो. मानवी मन ही असंच आहे बोधजीवन एक दशांश अन् उरलेलं सारं अबोध जीवन.कधीही न दिसणार मन. कधी अबोला धरतं सख्ख्या नात्यासोबत. तर कधी संघर्ष करतं परिस्थितीशी. कधी राखेतून फिनिक्स सारखे पेटून उठते. तर कधी दोनशे रुपयांच्या कर्जासाठीही स्वतःला फासावर चढवते….!

केवळ आभास… जाणीवेची विचलित अवस्था.. माणसाचा भूतकाळ… शरीरातील एक अतिसुक्ष्म भाग… काय हे नेमकं माहित नाही. अनेकांनी शोधलंही आजवर पण कुणालाच सापडलं नाही. अबोल मन शोधण्याचा बहिणाबाईंनीही प्रयत्न केला होता त्यांना तरी कुठे सापडलं होतं ते?तेव्हाच तर त्या म्हटल्या होत्या…

“मन वढाय वढाय, उभ्या पीकांतलं ढोर,
किती हांकला हांकला, फिरी येतं पिकांवर.”

या अबोल मनाला बोलकं करताना कोणी याची व्याख्या अशी केली. मन हे सहसा संवेदना, धारणा, विचार , तर्क, विश्वास, इच्छा, भावना , प्रेरणा यासारख्या मानसिक घटनांमध्ये प्रकट होणारी एक संकाय होय. या अबोल मनाला व्यसन घालण्याचा प्रयत्न रामदास स्वामींनी ही केला होता

मना वासना दुष्ट कामा न ये रे।
मना सर्वथा पापबुद्धी नको रे॥
मना सर्वथा नीति सोडूं नको हो।
मना अंतरीं सार वीचार राहो||

अन् अशा चंचल पण अबोल मनाला आज काव्यात बांधण्याचा प्रयत्न केला ‘मराठीचे शिलेदार’ समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांनी. आज बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेच्या निमित्ताने त्यांनी ‘अबोल मन’ हा विषय दिला. अन मनाच्या या गर्तेत आज आमच्या कवी कवयित्रींनीही खोलवर जाऊन त्याला बोलकं करण्याचा प्रयत्न केला, आपल्या काव्यातून.
तेव्हा तुम्हा सर्वांचे मनापासून अभिनंदन व पुढील काव्य लिखाणास खूप खूप शुभेच्छा..!!

पण थोडं काही… मराठी कवितांचा अभ्यास करताना संत नामदेव यांच्या स्वरसंवेदना आणि रंगसंवेदना यांचं प्रतिबिंब त्यांच्या काव्यात पहावयास मिळते. सोबतच चांगल्या लेखनात साधेपणाचाच एक गोडवा पाझरत असल्याचीही अनुभूती येते. सौम्यतेलाही आपले म्हणून काही हळुवार मोहन असते त्याची प्रचितीही येते. त्यामुळे नामदेवांच्या कवितेला उचित तो गौरव प्राप्त होतो. चला आपणही प्रयत्न करूया संत नामदेवांच्या काव्यप्रपंचाचा थोडातरी अंश तरी आपल्यात उतरविण्याचा…!! तूर्तास थांबते.

सौ सविता पाटील ठाकरे, सिलवासा
मुख्य परीक्षक/प्रशासक/कवयित्री/कार्यकारी संपादक
©मराठीचे शिलेदार समूह

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles