पुण्याच्या दोन विद्यार्थ्यांचा येल विद्यापीठाच्या प्रतिरूप परिषदेत सहभाग

पुण्याच्या दोन विद्यार्थ्यांचा येल विद्यापीठाच्या प्रतिरूप परिषदेत सहभाग



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी पुणे

पुणे: येथील ‘द बिशप्स हायस्कूल, कॅम्प’ मधील नववीचा विद्यार्थी ‘सफल मुथा’ आणि प्राईड स्कूल, चिंचवड हायस्कूलची विद्यार्थिनी ‘रिदम मुथा’, या दोन शालेय विद्यार्थ्यांना संयुक्त राष्ट्र संघाच्या प्रतिरूप परिषदेत ‘येल’ विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी मॉडेल युनायटेड नेशन्स (YMUN 50) या प्रतिरूप परिषदेत सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते.

अमेरिकेमधील न्यू हेवन येथे १८ ते २१ जानेवारी दरम्यान ही परिषद संपन्न झाली.या परिषदेत विविध मुद्द्यांवर झालेल्या चर्चा, वादविवाद, भाषणे यात भाग घेऊन सफल मुथा व रिदम मुथा यांनी आपली मते मांडली. आपल्या सादरीकरणात त्यांनी विकसनशील देशांमधील “स्थलांतरित महिलांचे शोषण’ आणि ‘माता मृत्यू’ या मुद्द्यांवर मांडणी केली. नंतर ठराव तयार करण्यातही मोलाचा सहभाग नोंदवला. यात सफल मुथा याने “सर्वोत्कृष्ट सादरीकरण व्यवस्थापन” यासाठी तर रिदम मुदा हिने “उत्साही वक्ता” म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावली.

आपल्या या आगळ्यावेगळ्या अनुवाबद्दल बोलताना त्यांनी “जागतिक स्तरावरील विविध प्रश्न व नेत्यांच्या भावनेला खऱ्या अर्थाने आत्मसात करता आले.आमचे सादरीकरण व वक्तृत्वं कौशल्यांचा तिथे गौरव झाला, याचा आनंद आहे. आयुष्यभरासाठी हा एकमेवव्दितीय असा अनुभव होता.” अशी भावना व्यक्त केली. या प्रतिरूप परिषदेत ४५ हून अधिक देशांमधून सुमारे 2 हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles